सोमवार, १७ एप्रिल, २०१७

खोज...

खोज...

आज के दौर मे
हर व्यक्ती
अपने हि बनाये
चक्रव्युह से
मुक्ति चाहता है।
घुम रहा है...
मुक्ति और शांती,
कि खोज में,
एक घाव लिए
अश्वथ्थामा जैसा!
© शिव 🎭
17042017

रविवार, १६ एप्रिल, २०१७

प्रवास

प्रवास

प्रवास अनंताचा चिरंतन
अव्याहत चालणारा,
माझ्यातल्या मी पर्यंतचा
गूढ मनाला शोधणारा !

शनिवार, १५ एप्रिल, २०१७

पण काहीही म्हणा... जाहिरात


पण काहीही म्हणा...
जाहिरात

जाहिरातीचा भ्रामक भोपळा
पहा आता फुटू लागला,
सेलिब्रिटी सुध्दा आजकाल
त्या विरूध्द बोलू लागला !

पैसा मिळतो म्हणुन सारेच
कसलीही अँड करतात,
करून सवरून पुन्हा ते
बोंबा बोंब करू लागतात !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t28187/new/#new

शेवटास

शेवटास

पालखीस नसता कोणी भोई येथे
उतारला होता कोणी मेणा येथे

थवा काजव्यांचा जमवुन ती गर्दि
सुर्यास्ता नंतर पहा चमकला येथे

बाळगा सोबती तुम्ही कितीही चेले
शेवटास कामी येतो आपलाच येथे

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t28185/new/#new

मंगळवार, ११ एप्रिल, २०१७

नाद

नाद

हृदयस्थ नाद तो
अव्याहत नाद आहे,
आदि अंता स्तोवर
श्वासांची साद आहे !

=शिव
374/11-04-2017

कधी मी

कधी मी

शब्दांशी भांडतो कधी मी
शब्दांशी खेळतो कधी मी

व्यक्त करण्या विचारांना
अक्षरांस बांधतो कधी मी

कळावे कसे त्या मुक्यांना
असा का वागतो कधी मी

प्रयास करता हा शिकताना
काहीतरी लिहीतो कधी मी

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t28137/new/#new

सोमवार, १० एप्रिल, २०१७

बार


बार

कोल्ड ड्रिंक, चणा ड्राय
वा दुसरं काही मागवुन
नेहमी प्रमाणे
बसायला हवं,
केव्हां तरी असच
बार मधे जायला हवं !

कान, डोळे उघडे ठेवुन
मदं अंधार्‍या कोलाहलात
स्वतःच्या आवाजाला
ऐकता यायला हवं,
कधी तरी त्रयस्थ होऊन
बार मधे जायला हवं !

मिळवतात, काय हरवतात?
विखुरलेल्या दुःखांना,
कित्तेकांच्या
चेहर्‍यावरील आनंदाला
स्वतःचा समजून
विचारात घ्यायला हवं
न पिता.... कधी
बार मधे जायला हवं !

ज्ञान, सौद्यांचा हा बाजार,
कधी एैय्याशीचाच
मुक्काम असतो येथे,
उँच्चभ्रूंच्या हलक्या न्
सामान्यांच्या मोठ्या
बातांना ऐकायला हवं
उतरून वेष अापला
बार मधे जायला हवं !

दुध नाही मिळत
ना दुधा चा धुतलेला,
सापडतो येथे...
केवळ प्यायलेला,
तरीही नशा दोघांना
पिवुन एकाला, न्
एेकून एकाला
नशेत या झिंगता यायला हवं,
डोकवायला स्वःता मधे
बार मधे जायला हवं !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t28055/new/#new

मोगरा

मोगरा..

शनिवार, ८ एप्रिल, २०१७

दरवळ मोगर्‍याचा

दरवळ मोगर्‍याचा

सांगू कसे सखे मीे, भाव माझ्या मनाचे?
स्मरतात अजुनही, दरवळ ते मोगर्‍याचे !

क्षण सहवासाचे, पाकळ्यां सह फुललेले
पाना पानात दुमडलेले, सडे पाकळ्यांचे !

मोहवुन भारावलेले, श्वास ते गंधाळलेले
गंधाने गंधीत होता, देणे उरते मोगर्‍याचे !

हलकेच मज कानी, सांगते गुज मनातले,
ओघळता खांद्यावरूनी, फुल मोगर्‍याचे !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t28091/new/#new

शुक्रवार, ७ एप्रिल, २०१७

दरवळ

३७३ दरवळ
सांगू कसे सखे,
भाव माझ्या मनाचे?
स्मरतात अजुनही
दरवळ ते मोगर्‍याचे !
© शिव 🎭