सांज उतरू लागली
आता कुठे जराशी हलकेच सांज उतरू लागली
चाहूलीने तुज पैंजणाच्या स्पंदने ह्रदयाची वाढली
छेडतो तुज कुंतलांना वारा हा झोंबरा
पाहूनी सलगी अशी जीव होई घाबरा
ओढ तुज पावलांची पाण्याही लागली
फितूर पैंजणे ती पाण्याशी का बोलली...१
आता कुठे जराशी हलकेच...
स्वप्ने भेटीची कैक पाहिली मी आपल्या
खेळवीत राहिल्या मज इथे या सावल्या
सावरीत पदर अवचित कशी अवतरली
जाणिवेने हळव्या गात्रे गत्रे गं थरथरली...२
आता कुठे जराशी हलकेच...
पावलांना स्पर्श होता मऊशार साजरा
चेहऱ्यावरी उमटला भाव एक लाजरा
चित्र देखणे हे की शिल्पात तु प्रकटली
भेटीने आपल्या सांजहि आक्रसून गेली...३
आता कुठे जराशी हलकेच सांज उतरू लागली
चाहूलीने तुज पैंजणाच्या स्पंदने ह्रदयाची वाढली
https://marathikavita.co.in/marathi-song-lyrics/t37416/new/#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९