बुधवार, १४ जानेवारी, २०२६

हर्ष पर्व १४०१२०२६ yq ०९:४६:१५






















हर्ष पर्व 

मकर संक्रांति वो पर्व है
सभी भारतीयों को उसपर गर्व है
एक उत्सव अनेकों नाम
अनेकता में एकता ये शेष सर्व है

प्रकृति और परंपरा संग
हमारे देश का अनोखा आदर्श है
उमंग भरे इन त्योहारों से
हर कोई उठाता यहां नया हर्ष है


©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शनिवार, १० जानेवारी, २०२६

मनोगत १००१२०२६ yq १३:३८:१२

मनोगत

नकोय गंभीर चेहरा,नको वैचारीकतेचा आव
लिही मनापासून,मनी उमटलेला सच्चा भाव

नाही जमला जरी आकृतिबंध, नियम न् छंद
तरी नक्की घे, तुझ्या शब्दात भोवतीचा ठाव

युगानुयुगे विरोधच होतोय इकडे नाविण्याला
लखलाभ त्यां करती जे मारुनी मिशीला ताव
  
घेतील जाणकार समजून एकएक शब्द तुझा
लक्ष नको त्यांकडे, करती जे उगा काव काव

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

गुरुवार, ८ जानेवारी, २०२६

नेमके सत्य


नेमके सत्य

धडधडणे असे तुझ्या काळजाचे कळेना 
आकर्षण आर्ततेतले की गूढतेचे कळेना 

पंचतत्वात विरघळतो देह, म्हणतात जेष्ठ
परिणाम हे वर्तणुकीचे की ग्रहांचे कळेना

आहार,निद्रा,भय,मैथुन मापदंड जगण्या 
खरे वर्चस्व नैतिकतेचे की धर्माचे कळेना

काळानुसार उमटलेले ओरखडे मनावरचे
दिलेले तुझे? की आहेत, स्वतःचे कळेना 

अनादी ओढ शिवास सृष्टी न् अतर्क्याची   
नेमके सत्य, उजेड अन् अंधाराचे कळेना 

https://marathikavita.co.in/index.php?topic=74476.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मंगळवार, ६ जानेवारी, २०२६

ओढ नभाची ०६०१२०२६ yq १८:०८:०७


ओढ नभाची 

ओढ त्या नभाला, या नभाची लागली
होताच गळाभेट धरीत्री ही चिंब झाली

आतुरल्या या मृदेला,गंध मोहर सुटला
क्षणात अवघी सृष्टी, गंधाळून ती गेली

झाकोळल्या गगनी, रंग निळा सावळा
जणू भजनात सावळ्याच्या धरा दंगली

अंगोअंगी चिंब ओल्या फेसाळते भुमी
भासते अशी की,दुधात न्हाऊन आली

पांघरून घोंगडी करडी, दौडता चपला
भितीने तिच्या पाखरे अन् गुडूप झाली

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मंगळवार, ३० डिसेंबर, २०२५

जळते मंदिर

जळते मंदिर

नक्कीच गेले ते दिवस गेले आता 
वाटते, जगणे स्वार्थी झाले आता!

तिकीट आणि ए. बी. फॉर्म साठी 
बरेचसे भांडले, काही रडले आता!

प्रगती की अधोगती रे नैतिकतेची
नेमके यातील काय कळले आता?

कुठे चालली, लोकशाही आपली?
जेलमधून फॉर्म भरु लागले आता!

सत्तेसाठी सोडून, सारी नितीमत्ता
लोकशाहीचे मंदिर,जाळले आता!

https://marathikavita.co.in/index.php?topic=73939.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सोमवार, २९ डिसेंबर, २०२५

कोहरा २९१२२०२५ yq १७:४९:०७


कोहरा

अजीबसा रहताहै मन का कोहरा 
धूंधला धूंधलासा, खयाली नजारा

सोच, या कभीकभार कोई विचार 
अनजाने में अंदर दौडता है अधूरा

आकरहीन बादलों का, जमावडा
चमक भरी बूंदों का, घना अंबारा

ओढकर नर्म सफेद दूधिया चादर
अपनेही आगोश में सोया किनारा

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

निवड

निवड

मी स्वतःला निवडलं,त्यात काय बिघडलं?
सगळे तेच तर करतात,माझं काय चुकलं? 

जगरहाटी तर आहे, आपल्यापुरतं पहायचं 
उगा कशाला नवीन पायंड्यात अडकायचं? 

वहायचं खुशाल, वाहत्या वाऱ्याच्या दिशेने
पाहूदेत आपणांस भले मग कुणी आसुयेने

मी,माझं,मला करता करता आयुष्य सरतं
कळून देखील सत्य, मनाला काय कळतं?

क्षणभंगुर टिकतं, आकर्षण सारं ऐहिकाच 
फांदीवरलं पान तरी कुठे राहतंय फांदीचं? 

https://marathikavita.co.in/index.php?topic=73847.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

रविवार, २१ डिसेंबर, २०२५

विसरायचे का

विसरायचे का

या पुढे, नको अंतर आता क्षणभर 
चालुयात हवं तर, आपण समांतर 

कथा व्यथा झाल्या, खुप आजवर 
ठेवायच्या सुरु त्या,आपण कुठवर 

मनी इच्छा जर का खोल आतवर
भेटाया मग येतो, कसला अडसर 

नशील्या रंगी पसरवी गंधात अत्तर 
कायम येथे,पान गुलाबी हे निरंतर 

क्षणभर सारे,विसरायचे का अंतर
वेगळेच संकेत निसर्गाच्या वाटेवर 

https://marathikavita.co.in/index.php?topic=73353.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मंगळवार, १६ डिसेंबर, २०२५

तिच्या कविता

तिच्या कविता

ती नाही, पण तिच्या कविताच स्मरतात आता 
भासती मृगजळ आयुष्याच्या वाळवंटात आता 

सावलीत तारकांच्या..ओथंबल्या कधी भावना 
रात्रंदिन, कोणत्याही प्रहरी लुकलुकतात आता 

हळूवार स्वप्नांचे हिंदोळे..वाऱ्यावर त्या घेतलेले
गहिवरल्या अस्तित्वाच्या जाणीवा देतात आता 

पुन्हा कधी..अचानक आभाळ व्यापता मनाला 
निल नभाखाली..स्वप्ने डोळ्यात दाटतात आता

नसली जरी ती, तिच्या कविता स्मरतात आता
टायटॅनिक गीत हलकेच ओठ पुटपुटतात आता 

https://marathikavita.co.in/index.php?topic=73205.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सोमवार, १५ डिसेंबर, २०२५

खुद से

खुद से

बैठीं है तनहाई "खुद से" लेकर फूल उम्मीद के

कबतक यूहीं आजमाते रहेंगे 
हम खुद से खुद की दूरियाँ 
चाहकर भी, डूबना गहराई में 
डूबने ना दे, सुकूँ से दरिया 

अच्छाइयों का शौक है किसे?
ढूंढते हैं आजकल बुराइयां 
क्या होगा, पता नहीं आजका?
पढेंगे जरूर लोग कहानियां 

https://marathikavita.co.in/index.php?topic=73045.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९