अखेरचा तुम्हा दंडवत
अखेरचा घ्या तुम्हा दंडवत
सोडून देतो मिडिया
ग्रुपग्रुप मधून खूप बोललो
नको आभासी दुनिया
त्यां सोबतीने उठलो बसलो
कधी कधी तोंडावर पडलो
अखेरीस रे सत्य समजलो
कळली बोगस माया
वाटे सोडून जावे आता
भासच अवघे उरती आता
कुणी कुणाचा नाही त्राता
वेळ जाते बघ वाया
https://marathikavita.co.in/index.php?topic=89394.new#new
©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९









