मंगळवार, ३० सप्टेंबर, २०२५

व्वाह रे जिंदगी

व्वाह रे जिंदगी

खुप रहस्ये घेऊन जेव्हा असते जिंदगी
मनातल्या मनामधे तेव्हा हसते जिंदगी

कमतरता नाही भोवती येथे पारंगतांची
अमिषांना त्यांच्या सहज फसते जिंदगी

होऊन करता चांगुलपणा, अंगाशी येतो
धरून डोके आपलेच मग बसते जिंदगी

धावते,थकते रात्रंदिन न् लगेच जाणवते
खिजगणतीत कुणाच्याच नसते जिंदगी

वारंवार येता वाट्याला, सुन्न हताशपणा
स्वतःलाच रे  'शिव' सतत डसते जिंदगी

https://marathikavita.co.in/index.php?topic=66467.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९ 

मंगळवार, २३ सप्टेंबर, २०२५

रंग स्वप्न

रंग स्वप्न

डोळ्यात स्वप्न असतात...घेऊन कैक रंग 
उतरतात सत्यात काही,होतात काही भंग

सांडूनि रंग वर्ख..उरतात कित्येक माघारी
पाठलाग जीवनाचा करतात सारेच हे रंग

मिसळतात परस्परात मोजके ते पारदर्शी 
काहींच्या वाट्या असते, होणे स्वतःत दंग

त्यातल्यात्यात बरे स्वप्नां पुरताच खेळ हा 
सत्यात येता येता, टिकतील का यांचे ढंग

वाटते एक भिती अनामिक..रोज जागता 
अप्रत्यक्षपणे त्या, लागला माणसांचा संग

https://marathikavita.co.in/index.php?topic=65694.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

गुरुवार, १८ सप्टेंबर, २०२५

कारण

कारण
  

आनंदी व्हायला कारण कुठे लागते!
नाराज व्हायला कारण कुठे लागते!

झुळूक वाऱ्याची हळू स्पर्शून जाता 
कुणाला त्रासदायक का कुठे वाटते!

माझे तुझे अन् तुझे माझे, करतांना 
सौख्य खरे,अंतर्मनाला कुठे भासते?

अनिश्चित जीवन अल्पकाळ येथले
जाणण्या रात्रंदिन कुठे कुठे जागते!

म्हणा,गेला तो सुखाने, क्षण आला 
कवटाळून व्यथा,सुख कुठे लाभते!

https://marathikavita.co.in/index.php?topic=65304.new#new


©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मतला शेर १७०९२०२५ ya १४:०५:३०

मतला शेर

ये दुनिया किसी की सगी तो नहीं है
बेवजह तारीफ कहीं ठगी तो नहीं है

पहचान से सिर्फ करीब वो इतने आयें
और पता चला हमारी सखी तो नहीं है

चोंटें लगती है अक्सर कडवी बातों से
फिर पुछते है दिल को लगी तो नहीं है

अचरज है खैरात देता लालची देखना 
असल में इतना बडा त्यागी तो नहीं है

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

रविवार, १४ सप्टेंबर, २०२५

भास गोजिरा

भास गोजिरा

सखये भास तुझे भोवती का सारखे फिरावे
सावलीत न् कधी जळी प्रतिबिंबात दिसावे

बावरते वेळोवेळी, जसे वाऱ्यावरी फुल वेडे
बैचेन मन माझे का म्हणे भ्रमरा सम वागावे

छाया, पडछाया, अचानक कवडसे बिलोरी
धरु पाहता हाती सारेच का नजरेतून सुटावे

ओढ वेड्या मनाची, माझ्या आगळी वेगळी
जाणून सत्य ते, तुला सहज का न उमजावे

ठेवावी कुठवर मी आशा, भेट होण्या तुझी
विचार करता हसू, न् प्रत्यक्षात मी फसावे?

किती काळ जोपासू,भास हा मनी गोजिरा
भेट नसता समक्ष,जगण्या त्राण कसे उरावे

https://marathikavita.co.in/index.php?topic=64978.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शनिवार, १३ सप्टेंबर, २०२५

जुने संदेश १२०९२०२५ yq १५:१५:२५

जुने संदेश

पुन्हा आज पाहिले संदेश जुने तीचे 
उमगले गुण काही अधिक उणे तीचे 

आयुष्य का जगता येते, स्वप्नात येथे
सलायचे सत्यास खाली पाहणे तीचे 

असतात काही इच्छा आकांक्षा मनी
चुक होते एकांगी विचार करणे तीचे 

करावी मान्य परिस्थिती सत्य येथली
खरे का म्हणू भुतकाळात रमणे तीचे

नाही ठेवायचे बोट, 'ती' म्हणून मला 
संदर्भात होते, खुप हट्टी वागणे तीचे 

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, ५ सप्टेंबर, २०२५

पथदिप

पथदिप

देवोन दाखले, संताचे ते थोर!
वाटतो विचार, ज्ञानी श्रेष्ठ!!१!!

चरितार्था साठी, वाचताती पोथी!
कधी स्वार्था पोटी, भोंदु जनां!!२!!

मोह विसरण्या, स्वतः पुढारावे!
पथदिप व्हावे, बहुजणां!!३!!

कलीयुगी पुरे, नित्य ज्ञान आम्हा!
नामा,तुका,ज्ञाना, स्मरणांती!!४!!

जावोनी पल्याड, संताच्याही थेट!
नव ज्ञानामृत, द्यावे बुवा!!५!!

आधुनिक संता, करीतो विनंती!
साक्षात्कार अंती, लाभो शिवा!!६!!


https://marathikavita.co.in/index.php?topic=22318.msg60495#msg60495

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

रविवार, ३१ ऑगस्ट, २०२५

रात और मै

रात और मै

तनहाई को, गले से लगाया आज हमने
रात को आसुओं से सजाया आज हमने

बातें बहोतसी हुई दरमियान गमे दर्द की
जैसे मामला दिल का उठाया आज हमने

काफी देर तक, रोती रही रात लिपटकर
बडी मोहब्बत से,उसे मनाया आज हमने

फसाने कुछ और चलते हमारे सेहर तक
कहकर फिर मिलेंगे, सुलाया आज हमने

https://marathikavita.co.in/index.php?topic=63931.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सोमवार, २५ ऑगस्ट, २०२५

सिग्नल २५०८२०२५ १२:२५:०७

सिग्नल 🚸

एक प्रश्नचिन्ह लाल सिग्नल का
जबरन ठहरना पडता है 
ज़िन्दगी के  सवाल पर...

जगती है तभी यकायक 
आशा की गेरुई किरण, और
हम, तैयार होते हैं
सवरते है स्वयं को...

फिर शुरू होती है हरी दौड, 
रफ्तार में...अगले सिग्नल तक
अक्सर होतें है, एक पडाव
गंतव्य तक कि यात्रा मे...

और क्या लिखें?

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

बुधवार, २० ऑगस्ट, २०२५

स्वप्नरंजन २००८२०२५ yq १५:५२:४५


स्वप्नरंजन

डोळ्यात दाटे तुझे स्वप्न आता 
तुच दिसतेस रात्रंदिनी येताजाता 

जादुगरी कसली ही जीवघेणी
सुचेना कामधंदा, तुझी याद येता 

वेडेपणा केवढा माझ्या मनाचा
गडबडतो वास्तवात समोर तू येता 

धीट,अल्लड काय म्हणावे तूला
बोलतेस छान जराही न डगमगता 

हवासा खेळ हा सारा वाटे बरा
स्वप्नरंजन केवढे मनाचे पहा आता 

भास, आभास मात्र हे सगळे
दाटती डोळ्यात तूच स्वप्नात येता 

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९