मंगळवार, ३१ मे, २०१६

दे धक्का...! सोईचं राजकारण


दे धक्का...!

सोईचं राजकारण

ईथं सगळच राजकारण
तसं सोईचंच असतं !
कुणाशी कायम स्वरूपी
मैत्री वा शत्रुत्व नसतं !!

काम होई पर्यंत तसा
आपला तो बाब्या असतो !
काम झाल्यावर घरच्यांना
तो दुसर्‍यांच कार्ट वाटतो !!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-23986/new/#new

रविवार, २९ मे, २०१६

नशा


दे धक्का...! कमिशन


दे धक्का...!

कमिशन

रूग्णसेवा हिच ईश्वर सेवा
केव्हांच मागे पडली आहे !
केलेल्या शिक्षण खर्चाच्या
वसुलीची वेळ आली आहे !!

प्रत्येक काम आजकाल
उद्योग बनुन गेलं आहे !
डाँक्टरांना आता उघडपणे
कमिशन मिळणार आहे !!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-23926/new/#new

दे धक्का...! सदिच्छा


दे धक्का...!

सदिच्छा

ओपन हार्टसर्जरी होणार
नवाज शरीफ यांची,
सदिच्छा पोहचली त्यांना
पंतप्रधान नरेंद्र मोदींची !

स्वास्थ्य लाभो शरीफांना
स्वः प्रकृती साठी, न्
हृदय परिवर्तन व्हावे
आता शेजार्‍यां साठी !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-23916/new/#new

शनिवार, २८ मे, २०१६

दे धक्का...! कांद्याची हमी


दे धक्का...!

कांद्याची हमी

अतिपिकामुळे भाव उतरला
न् शेतकर्‍यांचा पारा चढला,
हमी भाव मिळावा म्हणून
सरकारला तो नडू लागला!

शेवटी १५ हजार टन कांदा
केंद्रातून खरेदी केला जाणार,
भविष्यात मात्र नियोजनबद्ध
लागवड करावीच लागणार !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-23914/new/#new

शुक्रवार, २७ मे, २०१६

दे धक्का...! हैप्पी बड्डे


दे धक्का...!

हैप्पी बड्डे

वाढदिवशी शुभेच्छा द्यायच्या
हा तर काँमन शिष्टाचार आहे,
पण "नो शासन ओन्ली भाषण",
असाच विरोधकांचा सुर आहे !

जनमत परीक्षेत पास झाल्यावर
मित्राने हळूच तीर सोडला आहे !
जाहिरातींवरील हजार कोटीचा
"आप"ने हिशोब मांडला आहे !

वयाच्या दुसर्‍या वर्षी हा प्रताप?
काय वेध घ्यायचा भविष्याचा ?
भलं बुरं तर बोलतीलच सगळे
तरी ठेवा मान तरूण जनमताचा !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-23903/new/#new

गुरुवार, २६ मे, २०१६

भास


रानामंदी


दे धक्का...! मेगा हाल


दे धक्का...!

मेगा हाल

मान्य, यंदा उन जरा जास्तचं आहे
माणूस तापतो, तीथं रेल्वेचं काय?
नियमित पणे बिघाड होत असतो
विकली मेगाब्लाँगचं फलित काय?

जीवन वाहिनी सार्‍या चाकरमान्यांची
अशी अचानक रखडून कशी चालेल?
"प्रभू" आपणच घ्यावी काळजी आता
पावसाळ्यात प्रशासनाचा कस लागेल!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-23888/new/#new

बुधवार, २५ मे, २०१६

दे धक्का...! दाऊदायण



दे धक्का...!

दाऊदायण

कित्तेकदा डझनभर पुरावे देउन
पाकिस्तानवर काही असर नाही,
करतील सुपुर्द शेवटी कंटाळून
म्हणतं,त्याची अाम्हा गरज नाही !

चघळून ठराविक काळा नंतर
उगाच वेधलं जातं जनतेचं लक्ष,
पकडून आणाच त्या दाऊदला
होउन देत एकदाचा सोक्षमोक्ष !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-23879/new/#new

जाता जाता आला

जाता जाता आला...

          आज आमच्या कडे तो आला, वा-याची थंड झुळुक घेवुन आला, मला फार सुखद बरं वाटलं, ट्रेन मधे लोक दरवाजा खिडक्या लावुन घेत होते... भिजायच्या भितीने, मी म्हटल त्यांना नका रे अडवू त्याला, परततांना तरी त्याला येवु दया, नाही थांबणार तो आता जास्त काळ.

          उतरल्यावर वाटत होतं, थांबेल तो जरासा, पण तोही लहान मुलासारखा आज हट्ट करून होता, कधी कधी हट्टी मुलाचा राग येतो, पण त्याचा नाही आला... कर हट्ट आणि भिजव सा-यांना, तप्त, तृषार्त धरणीला, थोडासा मिळेल दिलासा   शेतक-याला. भिजव आमच्या सो काँल्ड काँलिफाईड, वाँटरपार्कच्या पावसात भिजणा-यांना.

          एक वेळ होती घरचे लोक म्हणायचे "चल घरी, भिजु नकोस, पडसं होईल..." तरी पण हट्टाने भिजायचो, आता पावसाचा राग येतो, भिजायच सोडून आडोश्याला लपतो.... म्हणतात ना माणुस बदलतो? निसर्ग तसाच रहातो निरागस....

          मी वाट पाहीली थोडा वेळ, तो नाही थांबला मग मी पण निघालो त्याच्या सोबत... मनात काही काही आठवत होत...

          पाऊस बघ परतीचाआपल्या भेटीस परत आला,गाठले बेसावध मलातुझ्या भेटीचा योग न आला!


= शिवाजी सांगळे, बदलापूर

मंगळवार, २४ मे, २०१६

दे धक्का...! घरघर


दे धक्का...!

घरघर

महसूलमंत्र्यांना कायम घरघर
तसच काहीसं खडसेंच झालं,
एक काय सुटता फोन प्रकरण
जमिनीचं प्रकरण मागे लागलं !

त्यांच कर्तृत्व कितीे यात? न्
विरोधकांचा का हात आहे?
शोधुन पहावचं लागेल त्यांना
स्वकीयांचा का बनाव आहे?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-23876/new/#new

रविवार, २२ मे, २०१६

जख्म

त्रिवेणी...

जख्म
गवाहोंसे ना पुछो, वार किसने किया?
जख्म खुद बयाँ करेंगी

खंजर किसने चलाया !


© शिवाजी सांगळे

दे धक्का...! विद्यापिठ घोटाळा


दे धक्का...!

विद्यापिठ घोटाळा

पैसे घेउन पदव्या वाटल्या न्
मुंबई विद्यापिठाची प्रतिमा डागाळली
उत्तरपत्रिका घरपोच केल्याने
होती नव्हती अब्रु धुळीला मिळाली!

ऐतिहासिक वारसा जो होता!
भविष्यात पुढे कसा चालवायचा?
प्रमाणिक विद्यार्थ्यावर सुद्धा
सामान्यांनी विश्वास कसा ठेवायचा?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-23862/new/#new

पहेली



पहेली

युं तो कट रही है जिंदगी
यादोके सहारे, रफ्तार पर धीमी है,
चल रहा हुं, साथ तेरे जिंदगी
थाम हात मेरा, बिछडनेका डर है !

जख्म लाख सहें है जमानेके
फिरभी सजाये, मानो के तोहफे है,
वैसे तो दिल सभी को लगाते
अब प्यार तो सिर्फ गमोंसे होता है !

कैसे करे यकीन, अब जिन्दगी ?
पहेली अभी तक तो तू बनी है,
नहीं हमें, अपने ही नहीं, पर
अपनों के मौतका गम सताता है !

© शिवजी सांगळे 🎭

दे धक्का...! नीट नाटके

दे धक्का...!

नीट नाटके

"नीट" सक्ती आता वर्षभरा साठी
लाबणीवर ढकलण्यात आली !
अध्यादेश काढून मंत्रिमंडळाने
सर्वांकडून वाह वाह मिळवली !!

असा अध्यादेश जारी करून सुद्धा
विद्यार्थ्यामधे संभ्रम कायम आहे !
खाजगी व अभिमत प्रवेशासाठी
"नीट" परीक्षा बंधनकारकच आहे !!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-23852/new/#new

शुक्रवार, २० मे, २०१६

कागज के फुल


कागज के फुल

धुंद में लिपटी
सुबह की ओंस मे
कुछ कलियों को
सिसकते हुए सुना था !

गुजरते हुए कभी
बदनाम गलीयों से
कागजके फुलों को
महकते हुए पाया था !

© शिवाजी सांगळे 🎭

प्रेम...१


प्रेम...१

प्रेम श्वास जीवनाचा
जगती त्यावर सगळे,
भाव अतर्क्य प्रेमाचे
भावनाचे बंध आगळे !

प्रेमही तिथेच असत
ओढ जिथं अंतरीची,
नात्यात प्रेमाच्या मुळी
नसते भीती दुराव्याची !

थांबवू कसे कुणाला?
करू कशी साठवण?
श्वास वाहतोय माझा
घेऊन तुझी आठवण !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t16232/msg51633/#msg51633

अधिर मन



अधिर मन...

आजकाल मन उगी अधिर होते
जशी अचानक सर पावसाची येते !!धृ!!

येते गारव्याचे घेवुन स्पर्श कधी
कधी ओजळीत अश्रु हळुच प्रसवते !!1!!आजकाल मन उगी अधिर होते...

तोडून ऋतुंचे इंद्रधनु बंध सारे
स्मृतीं शलाका आपसुक लकाकते !!2!!आजकाल मन उगी अधिर होते...

वाहते मन गर्भ रेशमी जळा संगे
आठवांचे लेवुन वस्त्र पुन्हा तरंगते !!3!!आजकाल मन उगी अधिर होते...

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/gambhir-kavita/t17965/msg54510/#msg54510

तारा


तारा …

ताऱ्याची का चूक झाली?
झुगारून ती सारी कक्षा,
एकटाच उतरला तो खाली !

अवकळा का नभी आली?
तारांगण रिते का झाले?
कि नव पोकळी निर्माणली?

उल्का प्रलय होत रहातो
पडझड तर नियम सृष्टीचा
झुगारून देणे, अपवाद होतो !

म्हणतात, तारा तो निखळतो
विलय कि अस्त तो त्याचा?
मात्र जीवन स्वत:चे जगतो !
© शिवाजी सांगळे 🎭
https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t15376/

गुरुवार, १९ मे, २०१६

आरती श्री स्वामींची

!! आरती श्री स्वामींची !!

श्री स्वामी समर्थ
जय जय स्वामी समर्थ !
नामतव घेता मात्र
उरे आम्हा जीवनी अर्थ !
मोह दूर सारुनी
करावे देवा जीवन सार्थ !
करता ध्यान, साधना
समजुदे तव नामाचा अर्थ !
दयावी शक्ती, भक्ती
कष्ट जाउनी राहो परमार्थ !
अक्कलकोटी दयावे दर्शन
राहो आम्हा ईतकाच स्वार्थ !
मागणे सकळ शिवाचे
दयावे आम्हा मोक्षाचे तीर्थ !

© शिवाजी सांगळे 🎭
https://marathikavita.co.in/marathi-bhakti-kavita/!!-!!-15445/

दे धक्का...! मी माल्ल्या...


मी माल्ल्या...

वाटल नव्हतं एवढं
सहज शक्य होईल,
बुडवून बँकाची कर्जे
देशातून पळता येईल !

काय पण लोकांनी
केली मदत मनापासून,
जागले खरच ईमानाला
पहील्याच पेग पासुन !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-22988/new/#new

दे धक्का...! निकाल?

दे धक्का...!

निकाल?

दिलेल्या आमिषांचा
कि वाटलेल्या पैशाचा?
अन् केलेल्या कर्माचा
दिन आज निकालाचा !

कोण कामी येईल
कोण निकामी हाेईल?
भविष्य नेमकं याचं
निकालच ठरवतील !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-23822/new/#new

बुधवार, १८ मे, २०१६

एहसास


फुले वेचीता...



  



-: फुले वेचीता :-

 फुले वेचीता देवासाठी
  मनी एक विचार आला
  दिलेले त्याचे सारे काही
  आपण अर्पितो त्याला !

खरचं माझे माझे म्हणता काय असतं आपल? आपल्याला सतत वाटत कि मी हे केलं, मी ते केल वगैरे पण खरच काय करतो आपण? आपला श्वास सुद्धा कधी आपला उरत नाही. सारं तर त्या इश्वरानेच निर्माण केलेलं आहे, तरीही अहंकारी स्वर्थी माणुस स्वतःला प्रत्येक बाबतीत जोडत असतो, त्याचंच नेहमी नवल वाटतं.वास्तविक आपल्याला आपले षड़रिपु  म्हणजेच काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, द्वेष, मत्सर यांचा त्याग देवापाशी करता आला पाहिजे ते देवाला देवुन त्या बदल्यात त्याच्या कडून प्रेम, वात्सल्य, माया प्राप्त करायला हवी ज्या मुळे आपले जीवन समृद्ध व्हायला -या अर्थाने मदत होईल.


= शिवाजी सांगळे, sangle.su@gmail.com +91 9422779941 & +91 9545976589

मंगळवार, १७ मे, २०१६

संध्याकाळ...!



संध्याकाळ...!


फिरत फिरत समुद्र किना-यावर गेलो, तांबुस पिवळा मावळता सुर्य मला नेहमीच भुरळ घालतो, लाटा आज जरा मोठ्याच होत्या, जमेल तेवढं पुढे गेलो, दगडांवर, भिंतीवर आपटणा-या लाटांचे तुषार छानपैकी उसळुन अंगावर येत होते, त्यांची खारट चव ओठांवर जाणवत होती. सांजवारा पण हलकेच बोचरा होउ लागलेला... पक्षांचे थवे घरट्याच्या ओढीने परतीला निघाले होते, पण असं का वाटत होतं सुर्य अस्ताला जायला आज उशीर करतोय...?
"संध्याकाळ काल जरा जास्तच रेंगाळली,
तीलाही कळलं मला तुझी आठवण आली!"
स्वाभाविक आहे, अश्या रम्य वेळी तीची आठवण येणारच, निसर्गच तो, आपल्याला स्वत:त गुंतवतो हे मात्र सत्य. अशा समुद्र किना-यावरची संध्याकाळ आणि श्यामल काळे ढग जमा होता होता दुरवरून येणारा मातीचा दरवळ येउ लागला कि आपसुक आठवणी जीवंत होऊ लागतात. पावसा सोबत आमचं खुप प्रेमळ नातं आहे, किंबहुना प्रत्येकाच तसं असतंच... मग तो आला तर एकटा कसा येईल? तिला सुद्धा आठवण करून देईल...!
"नक्की ढगांनी केली असेल सरींची पाठवण?
आली असेल का तिलापण माझी आठवण?"
पाऊस पडायला लागला कि सारं कस मस्त, प्लेझंट, वेगळंच हवं हवंस वाटायला लागतं. पावसानं याववं, धुवांधार बरसावं आणि हो, अशा वेळी नेमकी आपल्याकडेच छत्री असावी व तिनं स्वतःची विसरून यावी! किंवा याच्या उलट झालं तरी चालेल, मग सर्वांच्या देखत, स्वतःच्या नकळत तीला सावरत, भिजत घेउन जायचं, पुन्हा दुस-या दिवसासाठी त्याच ओढीनं एकमेकांकडे पहायचं...
"सरींच कायं! त्या येतात धरणीच्या ओढीने
खुपदा झालो आम्ही सुध्दा चिंब जोडीने!"
केव्हा तरी परीस्थिती गडबड करते, तीचं किंवा त्याच नसणं, जास्त बोचरं भासतं, एकटेपणाचं वाटतं, मग मन कशातच रमत नाही, नेमकी ही अवस्था पाहून हळूच कुणीतरी आवाज देतं " , देखो मजनू जा रहा है..." किंवा "हिची तर पार लैला झाली गं" मग उगीच छातीत धडधडायला लागतं, पण चेह-यावर ते न दाखवता चटकन तिथुन सटकायचं. शरीराने पळतो खरं, पण मनाचं काय? ते तर केंव्हाच ट्रांन्स मधे गेलेलं, आठवणींच्या सरीत चिंब भिजत राहीलेलं... दोन्हीकडे तीच परीस्थिती, कुणी कुणाला समजवायचं? पण ते शक्य नसतं उरतं फक्त परस्परांसाठी झुरणं... कधी थेंब थेब अश्रुंचं झरणं...
"कधी चिंब पावसात आठवणींच्या भिजायचं 
सवय लागते मग एकमेकां साठी झुरायचं!"
पाऊस मग दरवर्षी येतच राहतो, ॠतुचक्रा सोबत जीवन चक्र पण चालत रहातं, आता आणखी एक छोटी छत्री सोबत आलेली असते, पावसाची परीभाषा थोडीशी बदलते, बोबडी होऊ लागते... पाऊस येतच राहतो...
मग येते अशीच एक संध्याकाळ, आयुष्याची. दोहोंपैकी कुणीतरी एकजण  पहीला नंबर लावतो, मोकळा होतो... पुन्हा नवा भुतकाळ दुस-याला गोठवतो. आराम खुर्चीत बसुन आठवणींचे झोके घेत रहातो, डोळ्यांच्या कडा ओल्या होउन सुकून जात असतात... आपोआप डुलकी लागते, शरीराच्या थकव्याने व मनाच्या एकटेपणाने. इतक्यात नात किंवा नातू खुर्ची हलवतात, मग सारी मरगळ दूर होते व त्या बाल रूपा सोबत परत एक संध्याकाळ स्मरू लागते... मनात रेंगाळत राहते.

= शिवाजी सांगळे,बदलापूर, +९१ ९४२२७७९९४१ & +९१ ९५४५९७६५८९ sangle.su@gmail.com
Marathi Lekh, November 01, 2015,01:25:08 PM http://marathikavita.co.in/marathi-lekh/!-21284/new/#new

 

दे धक्का...! पार्ट टाईम

दे धक्का...!

पार्ट टाईम


कायदा सुव्यवस्था खालावली
इतपत बोलणं ठिक आहे,
गृहमंत्रीपद द्यावे सक्षम नेत्याकडे
सुचविण्यात काय गोम आहे ?

राजकारण काहींना तर नक्कीच
फुल टायमाचं काम आहे,
प्रसिद्धीच्या झोतात राहणार्‍यांना
हा पार्ट टाईम जाँब आहे !

© शिवाजी सांगळे 🎭

http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-23801/new/#new

सोमवार, १६ मे, २०१६

शाम कहती है...

शाम कहती है...

मुझे इंतजार रात का,
किरणोंको समेंटती जाऊं मै,
उसकि आगोश मे...
सहि है तपिश सुरज कि,
अब चंद्रमा सहलाएेगा मुझे
सुनाकर रातकी लोरीयाँ!

© शिवाजी सांगळे 🎭

रविवार, १५ मे, २०१६

माझी मुंबई... आठवणीतली आणि आजची....

“ माझी मुंबई “

     मुंबई शहर, तुमच, आमचं, सगळ्याच! ज्यांनी पाहिलं नाही त्यांच्या स्वप्नातलं! जगातील प्रत्येकाला वाटत, एकदा तरी इथ याव, इथले लोकं, बस, ट्रेनची गर्दी पहावी! वडापाव, कटींग चहाची चव घ्यावी! अविरत धावणार, कधीही न थांबणारं, जगातील सांर काहि एकवटलेल शहर म्हणून याचं सर्वांना आकर्षण, आणि हिच मुंबईची कालपर्यंतची ओळख.

     पण आता, मुंबईत खुप बदल झाले, बरेच चढउतार आले! पिढी बदलली, लोकहि बदलले, मुंबईने जुन्या नव्यांना सामावून घेतलं, आपलसं केलं, त्यामुळे मुंबई स्वत: बदलली. आता मुंबईत आहेत उंच गगनचुंबी ईमारती, सतत वाहणारे उड्डाणपूल, गर्दीने तुडूंब भरलेल्या बसेस, लोकल ट्रेन्स, आणि धावणारी, दडपणाखाली जगणारी माणसं.

     पूर्वी इथ मिल होत्या, कारखाने होते. पण आता... ते सारं गेलं, उरलेत ते फक्त त्यांचे भग्न अवशेष! त्यात होताहेत अपराध आणि सामुहिक बलात्कार. अशी नवी ओळख आता मुंबईची होवू लागली आहे. पण, आजहि खुप लोकांना जुन्या मुंबईची आठवण आहे, ज्याकाळी कशाची भीती नव्हती, एकमेकांची काळजी होती, दुसऱ्यासाठी जगणं होतं, बरचस आनंदाचं होत, सुखाच होतं, आपलेपणाच होत...! त्याच आठवणीचा हा एक काव्यात्मक प्रवास.......“ माझी मुंबई “
A poetic Journey of Mumbai…


माझी मुंबई ...

दुध केंद्रावर बाटल्यांची,
नाक्यावर पेपरवाल्यांची
शाळेत जाणाऱ्या मुलांची,
पाळीवाल्या कामगारांची
गर्दी असायची तेंव्हा मुंबईत !

मुलांना मास्तरांची,
भुरटयांना पोलिसाची,
उचल्यांना दुकानदारांची,
माणसाला देवधर्माची,
भीती असायची तेंव्हा मुंबईत !

दुपार नंतर केंव्हाही,
आंटीच्या अड्ड्यावर पिणाऱ्याची,
चौपाटीवर मालिश वाल्यांची,
रस्त्यावर गंडेरी वाल्यांची,
गर्दी असायची तेंव्हा मुंबईत !

संध्याकाळी चाकरमान्याची,
त्यानंतर उशीरा शौकीनाची,
चौका, वाड्यांमधून खेळांची,
रात्री पोलिसाच्या गस्तीची,
गर्दी असायची तेंव्हा मुंबईत !

© शिवाजी सांगळे 

दे धक्का...! बेस्ट उत्पन्न



दे धक्का...!

बेस्ट उत्पन्न

रोज शाळेत तीनचं सोडलं
लहाणपण बेस्टने घडवलं,
कुठतरी तीचं आता आता
घोडं पण आडकू लागलं !

खरा प्रवासी हल्ली तीचा
लांबवर मुंबई बाहेर गेला,
उरलेल्यांनी फिरवली पाठ
मग उत्पन्नात तोटा आला !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-23787/new/#new

शनिवार, १४ मे, २०१६

दे धक्का...! "नीट"

दे धक्का...!

"नीट"

डाँक्टर होणार्‍यानां दोन महिन्यात
"नीट" अभ्यास करावाच लागेल,
तुर्तास तरी सर्वोच्च न्यायालयाचा
निर्णय सर्वांना मान्य करावा लागेल !

परिक्षा कोणतीही असो ती थेट घ्या
"नीट" साठी हा आग्रह यंदाच का ?
परिक्षेला अभ्यास आलाच, मग तीला
एकच अभ्यसक्रम न् वेळ नको का?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-''-23781/new/#new

शुक्रवार, १३ मे, २०१६

दे धक्का...! स्टाँक



दे धक्का...!

स्टाँक

मद्ध्य  निर्मिती उद्ध्योगांना
पाणी कपात लागली आहे,
उत्पादनावर याचा परिणाम
नक्की चांगला होणार आहे !

या आधीच विजय मल्ल्या
परदेशी निघुन गेलेला आहे,
मद्धपींनो व्हा अँलर्ट आता
स्टाँकची सोय करायची आहे !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-23545/new/#new

गुरुवार, १२ मे, २०१६

अवकाळी


नजर


नजर


फिरते मुक्त ती सर्वत्र
तशी नजर चंचल तर असते

तूला वाटतं का? तुझ्याकडे पाहते?

© शिव 🎭

नभांनो




नभांनो

पहा रे नभांनो, जरा इथं डोकावून
कणकण धरतीचा गेलाय कोराडून !

© शिव 🎭

बुधवार, ११ मे, २०१६

दे धक्का...! बोध



बोध

कशापासून काय बोध घ्यावा?
हे प्रत्येकाच्या स्वभावावर असतं,
अनुकरण करायचं जरी असेल? ते
कुणाच करताय हे पहायचं असतं !

काहीबाही पाहून जगतात काही
चित्रपट पाहून का जगता येतं?
काँपी करून चित्रपटाला अखेरी
कुणाच्याही आयुष्याचं सैराट होतं !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t23733/

मंगळवार, १० मे, २०१६

ओळख

त्रिवेणी

ओळख

आसमंत सारा ओळखतो मला
अज्ञात चेहर्‍यांच्या शहरात,

का म्हणता अनोळखी मी इथं?

© शिव 🎭

रविवार, ८ मे, २०१६

प्रकाशात रात्र प्रहरी

प्रकाशात रात्र प्रहरी

विविध रंगी भासली माणसं
धावपळीत हिरवी बरीच
थोडीफार मंद, सुस्त पिवळी
स्तब्ध साम्राज्यात लाल सर्वत्र !

मळकट, घामेजलेे याचकी
अव्याहत सुर काही रंगांचे,
खाकी रंग सदैव फिरते
अनिर्बंध अगम्य गोंगाटाचे!

धडधडते ईंजिन काळीज
आणखी हळवी सासुरवाशीन,
घेउन स्वप्नरंग चाकांवरती
हरखलेली, बसलेली सावरून!

अनेक छटा श्रीमंतीच्या
बाबा गाडीतल्या बाल हसण्याच्या,
काही आक्रोशुन पहुडलेल्या
फाटक्यावस्री विस्कटल्या केसांच्या !

© शिवाजी सांगळे 🎭

http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t23692/new/#new

शनिवार, ७ मे, २०१६

Memories

Memories

How shall i forget
Markings of memories,
Those Angry & greed trails
Spent for years together...

What to say? to the world?
About your crazy company,
Seems no need of
Saying thank you and sorry...

Stories of our friendship
Will cherish forever,
My heartily wishes to all
Stay blessed forever...!

© shivaji sangle 🎭