चंद्रभास
कळत नाही...काय करावं
भासातलं जीवन कसं जगावं!
पाहता वास्तव हे भोवतीचे
मृगजळामागे कुठवर पळावं?
कळेना फरक वास्तवातला
खरंखोट सगळं कसं उमजावं?
धरु पाहता हाती तारामंडल
चंद्र आभासाने, किती छळावं?
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
व्याजाची लालच
"लालच बडी बुरी बला है"
जुने जाणते खरंच सांगून गेले
खुपदा फसवणूक होऊनही
लालची व्याजामागे धावून गेले
ठराविक काळाने फसवणूक
हा सुनियोजित कट रचला जातो
सामान्य कष्टकरी अलगदपणे
असल्या जाळ्यात फसला जातो
https://marathikavita.co.in/index.php?topic=49775.0
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९