बुधवार, २ नोव्हेंबर, २०१६

उपहार


दोष द्यावा कुणा?


दोष द्यावा कुणा?

भासात जगणे म्हणावे
कि जगण्याचा हा भास?
अाश्रित असा का कुणी
परकाच भरवितसे घास !

निरागस काही, काहि
शांत शांत अतिव आत,
नजरेत पाझरे भाव तिव्र
जेंव्हा हृदयी फुटे अकांत !

उरे ना भान जगण्याचे
मरण, ते ही सुधरेना
जन्म, का व्हावा गुन्हा?
दोष द्यावा तो कुणा ?
© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/gambhir-kavita/t25968/new/#new

शनिवार, २२ ऑक्टोबर, २०१६

पण काहीही म्हणा... हातात हात


पण काहीही म्हणा...
हातात हात

राजकारणावर आता काही
नवं लिहावसं वाटत नाही,
कोणताही रंग कसा असो
कुणातच कसला दम नाही !

दाखवायचे दात प्रत्येकाचे
इथे वेगळे वेगळेच आहेत,
खातांना मात्र प्रत्येका हाती
एकमेकांचेच  हात आहेत !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t25832/new/#new

शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

!! आरती श्री स्वामी समर्थ !!


!! आरती श्री स्वामी समर्थ !!

श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ
तुम्हा कृपेने, जीवन आमुचे होउ दे सार्थ!!धृ!!

कृपा तुमची सदैव असता, ना हो कुणी कष्टी
राहुनी अक्कलकोटी, असते आम्हावरी दृष्टी
गाउ किती, वर्णु किती, करू किती स्वार्थ
तुम्ही दिला, तुम्ही घडविला, जीवनासी अर्थ

श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ
तुम्हा कृपेने, जीवन आमुचे होउ दे सार्थ !!१!!

भिऊ नकोस म्हणता, नेमे पाठीशी असता
संकट काळी, बळ देउनी, हरविल्या चिंता
वेळोवेळी प्रत्यय देउन, दिले कृपा तिर्थ
होउन आता कृष्ण, करा शिवास कृतार्थ

श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ
तुम्हा कृपेने, जीवन आमुचे होउ दे सार्थ !!२!!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-bhakti-kavita/!!-!!-25800/new/#new