गुरुवार, १३ जून, २०२४

ओढ वेडी



























ओढ वेडी

आस चांदण्यांची मनाला...या लागली 
चाहूल प्रेमाची तीच्या मला रे उमजली 

एक एक तारकात तीचेच भास देखणे 
ओढ आता मजला भेटण्याची लागली 

काळोखात बैसलो जरी एकटा इथे मी
जाणीव भोवताली तीची होऊ लागली 

खोटे परी लाघवी आभास सारे भाबडे 
स्पर्शात का हळूवार ती उगा रेंगाळली 

उरतो ना, मीच माझा सोबतीत तीच्या 
अशी कशी ओढ वेडी मना या लागली

https://marathikavita.co.in/index.php?topic=45263.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, ७ जून, २०२४

अज्ञात काहूर


























अज्ञात काहूर 

मनाला छळतंय...एक काहूर अज्ञात
दडलेलं कुठेतरी खोलवर आत आत

शोधता सापडेना उत्तर या अतर्क्याचे
तरी चालतोच खेळ मनाचा आवेगात

अदृष्य..जाळीदार भविष्य पुढ्यातले
खेळवते, गुंडाळते अस्पष्ट भविष्यात

सोडणे, तोडणे पुन्हा पुन्हा ते जोडणे
सरते का आयुष्य एवढेच करण्यात?

कधी कधी पैलतीराची..लोभस दृश्ये
जोडू पाहती..हळूच त्यांच्या बंधनात

https://marathikavita.co.in/index.php?topic=45262.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

गुरुवार, ६ जून, २०२४

प्रत्येकाचा पाऊस ०६०६२०२४ yq ०८:४१:१०



























प्रत्येकाचा पाऊस

पावसाच्या प्रतिक्षेत...अवघे सान थोर 
कुणा हवा, भिजण्याचा चिंब आनंद 

पडत्या पावसात, न् तडतडत्या थेंबात 
होऊ इच्छिती काही आठवणींत धुंद

गळक्या छताची त्या काळजी कुणाला 
सहल प्रिय, कुणा भिजण्याची हौस

बरसावे त्याने, साऱ्यांना वाटते, कारण
प्रत्येकाचा असतो इथं वेगळा पाऊस

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

बुधवार, २९ मे, २०२४

भेळ

भेळ
























https://marathikavita.co.in/index.php?topic=45261.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

बुधवार, २२ मे, २०२४

हशील



























हशील

बरंच काही हरवलंय काळाच्या ओघात
किती छान होत नाही का नातं लोकात !

खुप काही घडायचं, तरीही पडत नव्हत
तेव्हा, उगाचच कुणी कुणाच्या मध्यात !

लोकांना वेळ अन् रहाणी साधीच होती
पगार कमी होता, पण रहायचे झोकात !

ठिक आहे, वेळ सरली, काळ बदलला
दिसत नाही पुर्वीचा, एकोपा जगण्यात !

तंत्रज्ञान बदलले, विचार सुद्धा बदलले
हशील आहे का काही विरोध करण्यात?

https://marathikavita.co.in/index.php?topic=45260.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शनिवार, १८ मे, २०२४

रेघोट्यांचा देह

रेघोट्यांचा देह

निश्चल या मन डोहात हे तरंग कसले उठती
अज्ञात गूढ पाताळी कधी उंच नभात जाती

पदन्यास आतुर दिसता नाचरी प्रकाश नक्षी 
तीरावरती सहज याच्या हिरवे कोंब डवरती 

सोडू पाहता पाश मातीचे देही या भिनलेले
नकळत का मुळे देहाची खोल आत रुजती

आक्रसल्या नेत्रांना हल्ली, सारे स्पष्ट दिसते
वाहूनही साचले पाणी, फिरून ते डबडबती

कुठवर आता सांभाळावा देह हा रेघोट्यांनी
धूसर आकाश पक्षी अवघे जाळे विणून देती

https://marathikavita.co.in/index.php?topic=45259.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

रविवार, ५ मे, २०२४

सौदा



























सौदा

नींद का सौदा किया मैंने आखों से
आना नहीं दबे पांव उसने धोखे से

बादल ये लेकर स्याही नीली काली
जमातें है डेरा नजाकत भरें मौके से

घिर आते ही, सितारे चूपचाप कभी
महसूस होता है, स्पर्श कई हाथों से

भूल जाता हूँ पता नहीं कैसे खुदको
उड जाती हैं, नींद भी मेरी आखों से

शांत निरव शित समय कट जाता है
कहते सुनते सुख दुखों कि बातों से

https://marathikavita.co.in/index.php?topic=45257.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

बुधवार, १ मे, २०२४

कामगार ०१०५२०२४ yq ०४:२४:१२



























कामगार 

मी कामगार होतो कधीकाळी
होत्या मिल शहरात अन् चाळी

मिल, चाळी इथून सागळे गेले
कॉर्पोरेट कल्चर नी मॉल आले

गम्मत ती हरवली सणासुदीची
काळजी माणसां फक्त वेळेची

मालक, कामगारां मधला सुप्त
अज्ञात असा जिव्हाळा लोपला

असून नसून परस्परांकडे पैसा 
शोधा खर आनंदी कोण झाला

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सोमवार, २९ एप्रिल, २०२४

गुंता नात्यांचा २९०४२०२४ yq १७:०९:२३























गुंता नात्यांचा

गुंता नात्यांचा, प्रश्न भारी डोकेदुखीचा
होताच गैरसमज उरे ना कुणी कुणाचा!

सर्व दूरवर त्वरित पसरतो वणवा असा
हरएक उचलतो मौका तेल ओतण्याचा!

खरी गरज जपण्याची हल्ली नात्यांना
मैत्री, ओळख, वा असो संबंध रक्ताचा!

सहाय्य मदत, कशी काय कधी होईल
विसरावा का सर्व अनुभव कोरोनाचा?

सांभाळून घेता आत्मसन्मान आपला
तरीही सुप्त मनी उरतो गुंता नात्यांचा!

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शनिवार, २७ एप्रिल, २०२४

घेऊ पाहून

घेऊ पाहून 

तोलतो मला, जो तो आपल्याच नजरेच्या तराजू मधून
नको घाई मित्रानों एवढी जागी माझ्या पहा उभे राहून

सोसले अन् घाव झेलले, अगणित सोनवर्खी हत्यारांचे 
उभा राहिलो सामोर तरीही प्रत्येकाच्या मोकळे हासून

चालायचेच खेळ असे प्राक्तनाचे जुने अन् नवीन सुद्धा
रंग खरे खेळण्यात त्या आपले प्रत्येकाने दिले दाखवून

गोठले, आटले बर्फ जे आत आत धुमसत्या भावनांचे
ठेवले आक्रंदत त्यांना मी कसोटीवर काळाच्या बांधून

टळते वेळ, सरते वेळ घेऊन प्रत्येक वेळी एक हुशारी
होणारे ते होऊन जाईल, त्या त्या वेळी ते घेऊ पाहून

https://marathikavita.co.in/index.php?topic=45256.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९