सोमवार, १६ सप्टेंबर, २०२४

भविष्य १६०९२९२४ yq १७:३४:०५























भविष्य

भविष्य का एक पन्ना
चंद लोग लिखतें है
भविष्य का अनुमान
बहोत लोग लगाते है

बहुत बातें फिर भी
अनजानी रहती है
मेहनतकश लोग तो
रोज जीवन जीते हैं

16-09-2024 YQ 05:34:05 PM

रविवार, १५ सप्टेंबर, २०२४

यात्रा १२०९२०२४ yq १२:३२:०२



























यात्रा

काश, रास्ता पता होता
तुम तक पहुंचने का
युहीं नहीं, लेकर बैठते
अंबार ये झुर्रियों का 

वक्त सारा बितता रहा 
दूरियां अचल ठहरी
अधूरीसी यात्रा तुम्हारी 
मेरी झुर्रियों से भरी

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९


बुधवार, ११ सप्टेंबर, २०२४

झाले पुरेसे

झाले पुरेसे

इथेच मरायचे प्रत्येकाला त्याच वाटेने जायचे
कळतंय सर्व जगताना तरीही हेवेदावे कशाचे

कोण मी नी कोण तु, घडीभराचे की रे सोबती
नेणार का सोबत काही, का उगा वेड संचयाचे

फायद्या विन जीवन सरते करण्यात माझे तुझे
होते रस्सीखेच हयातभर पाळून भूत संशयाचे

झाले का भले आजवर धरून वैरभाव कुणाचे
कसा विसरतो माणूस दाखले सारे इतिहासाचे

जगलो इथवर एवढेच होते रे क्षण होते बाकी
भोगले काय कसे, सारेच कसे काय सांगायचे

झाले पुरेसे प्राक्तनाने जे दिले आनंदी होताना
खुणावता वाट सुगंधी, शिव' न् काय मागायचे

https://marathikavita.co.in/index.php?topic=45293.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

अपघाती मरुन जाता





























अपघाती मरुन जाता

पोर्शे, मर्सिडीज, टोयोटा न् आता ऑडी
पण काहीही म्हणा जोरात ठोकते गाडी
गाड्या तर म्हणं इंपोर्टेड हायेत साऱ्या
चुकतोय का हाकायला, डायव्हर गाडी?

कोण खरं, कोण खोटं? ठरवणार कोण
मोठ्यांचं तर काय,ते मँनेज पण करतील
जीवानिशी गेले, ते खरे व्यापातून सुटले
अपंग जे झाले त्यां मागे कोण धावतील

तारखा पडतील खुप सत्याचा शोध घेता
कळत नाही, चूक नक्की कोणाची आता
दबला कसा सामान्य टायर खाली यांच्या
कोण सांगणार खरं अपघाती मरुन जाता

https://marathikavita.co.in/index.php?topic=45292.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०२४

सामान्यांचे काय पडले?

































सामान्यांचे काय पडले?

जाहिराती, घोषणांमधे मग्न सारे
त्यांना सामान्यांचे काय पडले?
तळी उचलणे, नावे ठेवणे इतुकेच 
त्यांच्याकडे काम की उरले !

सत्ता, अन् सरकारी साधन संपत्ती
तयांच्या हातचे खरे बाहुले,
राजरोस उपभोग घेण्यात मग्न सारे
त्यांना सामान्यांचे काय पडले?

वात्रटिका, September 06, 2024 YQ 02:58 :05 PM 

बुधवार, ४ सप्टेंबर, २०२४

देश माझा

देश माझा

विखुरला गेलाय? की
विकला गेलाय देश माझा?

नक्की काही कळत नाही
कधी नेते, पुढाऱ्यांच्या हाती,
कधी व्यापाऱ्यांच्या हाती,
न् जाती धर्माच्या वेठीला
कधीचाच बांधला गेलाय देश माझा...!

वरपासून खालपर्यंतचा भ्रष्टाचार
राज्या राज्यातले घडणारे अत्याचार, 
घोटाळे आणि गैरव्यवहार
तरीही चालतोय...कोणत्या
भाबड्या आशेवर देश माझा...?

जागतिक स्तरावर लोकसंख्येत 
मोठा असूनही महासत्ता
होणार म्हणतो आम्ही...
म्हणून का जाहिर करतोय
नवनव्या योजनांची खैरात आम्ही?

फुकट सुविधा, अन्नधान्य, अनुदान
घर बसल्या जर मिळतात पोटाला!
धीट होतो प्रत्येकजण, आपल्या कक्षेत
मग हवयं कशाला कष्ट, काम कुणाला?

पाचशेची नोट, क्वाटर, भांडी न् साड्या
पाच वर्षांकरता टिकतात आम्हाला...
मोकळे पुन्हा मतदानाच्या रांगेत जायला  
अशीच लोकशाही का काय ती? हवी
आंधळ्या प्रजेला, उजेड हवा कशाला?

https://marathikavita.co.in/index.php?topic=45291.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सोमवार, २ सप्टेंबर, २०२४

इथे अंधाराचे खेळे






























इथे अंधाराचे खेळे

इथे अंधाराचे खेळे, सारे स्तब्ध होती व्यवहार
गल्ली बोळातून होई, यंत्रणेचा उध्दार उध्दार 

कामे जाती हो थांबून, राहते जनता अडून
होता सुन्न भोवताल, मनी शिव्याचेच थैमान
नको नको त्या शंकानी, उठते काहूर काहूर

वारा पाऊस थोडा येता, विज लगेच कापती
देत तीच जुनी कारणे, फोन देखील तोडती
संतापाने फुटे अंगी, घामाची नवी धार धार

घालवून नेहमी विज, येते वाढीव नवे बिल
करा निट हिशोब त्याचा, यां कोण हो सांगेल
हा कायम इकडे होतो, अजब प्रकार प्रकार

https://marathikavita.co.in/index.php?topic=45289.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

गुरुवार, २९ ऑगस्ट, २०२४

हरवलेले क्षण























हरवलेले क्षण

हरवलेले क्षण फिरून अनुभवावे म्हणतो
गूज सुखदुःखांचे पुन्हा आळवावे म्हणतो

आखीवरेखीव चौकोनात या जीव गुंतला
वाटते सानिध्यात सृष्टीच्या जगावे म्हणतो

कसली भुरळ पडते मनाला या क्षणोक्षणी
दगदगीस जीवनातल्या रे थोपवावे म्हणतो

सुखे आधुनिक अताशा, रोज रे भोगतांना
झोपडीत चंद्रमौळी, पुन्हा नीजावे म्हणतो

केवढी रे लालसा, तुला मानवा ऐहिकाची
त्यागण्याचे भान प्रसंगी सर्वां द्यावे म्हणतो

https://marathikavita.co.in/index.php?topic=45287.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मंगळवार, २७ ऑगस्ट, २०२४

बामसूरी
























बामसूरी

साद घाली तुझी ही बासुरी...कान्हा 
नाही प्रित तुजसारखी दुसरी कान्हा 

भूल पाडूनी करी चराचरा आपलेसे 
मोद शमवी दुर्जनांचे आसुरी कान्हा 

बावरल्या, कैक गोपिका, गुरे वासरे
अमृत सुरांनी, बोलते बासुरी कान्हा 

असो पावा, मुरली, वेणु अनेक नावे
मंत्रमुग्ध सुरात बोले बामसूरी कान्हा 

युगे लोटली, कैक शासक आले गेले
रूप सुरात न बदलली बासुरी कान्हा

https://marathikavita.co.in/index.php?topic=45286.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

रविवार, २५ ऑगस्ट, २०२४

सारस्वत २५०८२०२४ १२:५६:०५


























सारस्वत 

कवी प्रतिभेचा धनी 
लीन तो सरस्वती चरणी 

गोडी त्यास शब्दांची
भावनांची करतो मांडणी 

त्यां स्नेह वाङ्‌मयाचा
उभारतो कल्पनांची लेणी 

मोजक्या शब्दात मग
अविरत झरते एक लेखनी 

सारस्वतच जन्मता तो
म्हणे त्यां प्रतिभावंत कुणी

प्रेरणादायी कविता, 25-08-2024 YQ 12:56:05 PM
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९