शर्वरी
दिवस रात्र खेळ हा, सृष्टीची सृजनता
तुझे मला, माझे तुला, देणेघेणे दिगंता
तू आर्तता,तूच शांतता, संधेची पुर्तता
यामिनी, तू कामिनी, नभीची निरवता
घेऊनीया ध्यास तू,स्वप्नांची आरास तू
तूच एक स्तब्धता, कवेत,आसपास तू
थकल्यास आधार तू, कष्टास उतार तू
झोपेत अंधार तू, प्रेमिकांची ती उब तू
अशी उगवते शर्वरी घेऊनी चांदणे उरी
दाह देते विरहाचा, व्यापूनी सर्व अंबरी
https://marathikavita.co.in/index.php?topic=84122.new#new
©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९



















