रविवार, ९ नोव्हेंबर, २०२५

खता ०९११२०२५ yq १३:०३:०७























खता 

एक लड़ाई ख़ुद की ख़ातिर, लडने चलें
भीड़ भरे इस जहाँमें ख़ुद को ढूंढने चलें 

डूबता है अक्सर,जिस्म ये गहरे पानी में
बेझिझक आज हम दिलको डूबाने चलें

फैली है नफरत,चारों ओर गौर से देखो
खता जरा सी, मोहब्बत में भिगोने चलें

नादान, ना-समझ दिल यह एक बेचारा
देखकर उसे,ख़ुदगर्ज़ उससे खेलने चलें

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शनिवार, ८ नोव्हेंबर, २०२५

घोटाळे


घोटाळे

कधी सिंचन, कधी जमीन
आवळले जाणार चौकशीत गळे?

सारेच रखवालदार येथले
तहान भागवतांना गिळतात तळे!

बदलेल राजकारण म्हणता
सुकून जातात हो सामान्यांचे गळे,

सर्व कायदे नियम असता 
थांबणार आहेत का कधी घोटाळे?

https://marathikavita.co.in/index.php?topic=70167.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, ७ नोव्हेंबर, २०२५

फायद्यात यावे


फायद्यात यावे 

पाहिलेले एक स्वप्न केंव्हातरी सत्यात यावे 
शब्द भारदस्त चांगले माझ्या भात्यात यावे

लिहितोय हो, आजवर मी रोज काहीबाही 
गुपचूप कोणते तरी अनुदान खात्यात यावे 

घडताना उगा घटना विचित्र काही भोवती  
वाटेल का कधी कुणा फुकट गोत्यात यावे 

अशीच चालते,जगरहाटी आजकाल भावा 
नाही कुणी आप्त कुणाचे,का नात्यात यावे

सोसलाय घाटा बराचसा वावरताना इकडे
वाटते फिरून पुन्हा एकदा फायद्यात यावे 

https://marathikavita.co.in/index.php?topic=70081.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

बुधवार, ५ नोव्हेंबर, २०२५

नजारे किनारे























नजारे किनारे

नकोत हे नजारे नको चंद्र तारे
भावतात मला मोकळे किनारे

पायी खेळते मुक्त रेशीम वाळू 
मृदुल भास, अल्हाददायी सारे 

मंद स्पर्शातून, हळूवार छेडती
स्वरात वाहणारे, खोडील वारे

विसावा हा आतूरल्या जीवांचा 
भेटती येथे कैक अधीर बिचारे 

येथेच भेटते, क्षितिज गगनाला 
हवेत कशाला, डोईवरुन पहारे

आवडती मला, सागरी किनारे
नकोत चंद्र तारे, नको ते नजारे

https://marathikavita.co.in/index.php?topic=70004.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मंगळवार, ४ नोव्हेंबर, २०२५

घास























घास

शहरात माणसांच्या आजकाल 
कोल्हे,तरस,बिबटे हल्ले करु लागले,

आधीच इकडे काय कमी होते?
मुळ निवासी पुन्हा इथे परतू लागले!

आता दोष का द्यावा त्यांना?
आम्हीच केला घात,ऱ्हास निसर्गाचा,

सोडून मर्यादा, सीमा आपल्या
मनसोक्त घेतला आहे घास जंगलाचा!

https://marathikavita.co.in/index.php?topic=69929.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शनिवार, १ नोव्हेंबर, २०२५

जा रे जा रे पावसा

जा रे जा रे पावसा

जा रे जा रे पावसा,
शेतकरी भरतोय रे उसासा!
तु पक्का वागतो खोटा,
चिटींग करून पडतो मोठा!

थांब ग थांब गं सरी,
भरले बघ पाणी घरीदारी !
तरीही आलीस धावून,
गेले शेत, गुरं गेली वाहून !

अचानक पडतो रिमझिम,
होतात सारे ओलेचिंब!
मधेच पडतो मुसळधार'
पुरताच उडतो हाहाकर!

कारे पडलास अवकाळी,
सगळीकडे साचलीत तळी!
जावसं आता तू माघारी,
लोकांना घेऊ दे श्वास तरी!

https://marathikavita.co.in/index.php?topic=69526.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९