बुधवार, २६ नोव्हेंबर, २०२५

घुसखोरी





























घुसखोरी

कोल्होबाने आज धाव घेतली
वनमंत्र्यांच्याच मतदार संघात!

विचारायचा असेल त्याला प्रश्न
का हो घुसलात तुम्ही जंगलात?

आधी बिबटे, माकडं येत होते
आज कोल्हा भेटायला आला,

मानवाने येवढे मोठे पाप केले?
वन्यजीव शहरात येऊ लागला!

https://marathikavita.co.in/index.php?topic=71727.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

प्रशस्त मार्ग























प्रशस्त मार्ग

कोवळे सारे हे बांध भावनांचे 
करतात दृढ रे नाते परस्परांचे 

अंतरी कसलाच स्वार्थ नसतो 
जोपासताना भान सहकार्याचे

अस्तित्व हे मोजक्या श्वासांचे 
तुमचे,माझे न् आपणां सर्वांचे

वास्तव्य इथले..क्षणा क्षणांचे 
सुकर असावे,स्वप्न जगण्याचे 

सृष्टी नियमच हा सरळ साधा
असूदे प्रशस्त..मार्ग जीवनाचे 

https://marathikavita.co.in/index.php?topic=71720.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सोमवार, २४ नोव्हेंबर, २०२५

क्षण जपताना

क्षण जपताना 

काही विचार, बऱ्याच खणाखुणा 
येतात सर्व मनात, क्षण जपताना 

लाईट,फोकस, शटर नी अँपरचर
याच ट्रीक लागतात फोटो घेताना 

सोपे वाटते, पण तसे मुळी नाही 
भान असावे, कँमेरा हाताळताना

कँन्डीड, मायक्रो, प्रॉडक्ट, वेडींग 
अनेक फँकल्टीज येथे शिकताना

तंत्र,मंत्र असले जवळ किती जरी
लागते खास नजर क्षण जपताना 

https://marathikavita.co.in/index.php?topic=71551.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, २१ नोव्हेंबर, २०२५

समज

समज

तोल माझा का जातो हा प्रश्न मानवा तुला 
करून सारखा हस्तक्षेप काय मिळते तुला 

तालासुरात लयबद्ध चालते सर्व चक्र माझे 
बिघडवून, माझी रचना काय मिळाले तुला 

सहस्त्र करांनी दिले, जे मजकडे होते योग्य
लाभ त्यांचा घ्यावा कसा?ना उमजले तुला

अती तिथे माती होते, म्हणता रौद्र रूप घेते
तोल माझा तेव्हाच जातो? समज देते तुला

सावधान हो,सांभाळ तू अजूनही वेळ आहे 
कुशीत मज जन्म घेऊनही का न कळे तुला

https://marathikavita.co.in/index.php?topic=71303.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

गुरुवार, २० नोव्हेंबर, २०२५

पुरक २०११२०२५ yq १६:३४:०८

पुरक

होडीने नेहमी वाट पाहावी किनाऱ्याची
किनाऱ्याने पण प्रतिक्षा करावी होडीची 

समजून, अविभाज्यपण ते परस्परांतले
दोघांनी पण इभ्रत राखावी एकमेकाची 

त्रयस्थ असूनही खरी गरज लाट येथली 
अपरिहार्यता, स्विकारून घ्यावी लाटेची

म्हणो तरबेज आहे खुप कुणी स्वतःला 
चालत नसतेच, तरीही अरेरावी एकाची

म्हणताना आहो पुरक परस्परां आपण 
तेंव्हाच चालेल, नौका भावी जीवनाची 

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

बुधवार, १९ नोव्हेंबर, २०२५

उणीव १९११२०२५ yq २०:५५:०७

उणीव

का तुझीच उणीव भासते अताशा 
रात्र ही का अशी अंधारते अताशा

चंद्रही झाकोळून जातो एकट्यात 
भिती कशाची, त्या वाटते अताशा

तारका पण सर्व..मावळल्या नभी 
खंत कोणती त्यांस बोचते अताशा

रात्रंदिन आठवतो मी खुपदा,तुला 
उचकी एखादी का लागते अताशा

तिव्र जाणिवेत, तुज अस्तित्वाच्या
विरह वेदना, ह्रदयी दाटते अताशा

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सोमवार, १७ नोव्हेंबर, २०२५

चक्र वेळेचे

चक्र वेळेचे

चुकले आडाखे सारे,उरले फक्त पसारे 
उमजले ना चक्र वेळेचे, सत्य मात्र खरे 

चावी जोवर, दौड तोवर कर्म काट्यांचे
स्थितप्रज्ञ कुठे,कुठे उंच, उंचीवर मनोरे 

यंत्रवत अनुभवले बदल अनेक भोवती 
भावनाशून्य गतीत फिरतात नित्य वारे 

तास,मिनिट,सेकंद सर्व चक्राकार फेरा  
थांबून योग्य स्थानी देती आपणां इशारे 

वेळ टळते, वेळ थांबते, उंचीवरही नेते 
तरी ही महत्त्व, विसरतात लोक बिचारे 

https://marathikavita.co.in/index.php?topic=70942.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शनिवार, १५ नोव्हेंबर, २०२५

जनावरे आणि आम्ही

जनावरे आणि आम्ही

जंगली श्वापदे, कुठे बैल, म्हशी
शहरी जनावरे पण हल्ले करीत आहे

एकिकडे बिबट्यांचे वाढते हल्ले
का!माणसांचे अनुकरण करीत आहे?

आता निर्बीजीकरण बिबट्यांचे
करावे असले काही विचाराधीन आहे

आम्हीच तर विकासाच्या नावाने 
जंगल व्यापले हे बोलणे टाळतो आहे

अजूनही वेळ आहे सावरायला
ते भुकेसाठी,माणूस सत्तेत व्यस्त आहे

https://marathikavita.co.in/index.php?topic=70849.new#new


©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०२५

ऐसा लगता हैं

ऐसा लगता हैं

दुनिया से कट गए हैं,अब ऐसा लगता हैं
किससे हुयी गलती,मन सोच में रहता हैं

कमजोर नहीं है रिश्ते शाखों से जानते हैं
शायद,इरादा पतझड का गलत लगता हैं

इतनी आसानी से यूं न हम टूटते जड़ों से
जानेसे हमारे किसी को सुकून मिलता हैं

बेवजह, हरकत कोई तो बडी की होगी?
हर एक झोंका, हवा का पेड से कहता हैं

चलो अच्छा हुआ,वक्त पर समझ आया
एक अच्छा काम,किसीको तो खलता हैं

https://marathikavita.co.in/index.php?topic=70767.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

गुरुवार, १३ नोव्हेंबर, २०२५

गोष्ट आपली

गोष्ट आपली

कशी सांगू?तुझी माझी गोष्ट मी कुणाला 
काय नाव देवू मी मग आपल्या नात्याला 

बरं,दिलंच जर मी "प्रेम" हे नाव नात्याला 
खरं सांग, सहज पटेल का तुझ्या मनाला 

नातं धरती आकाशाचं, किनारा न् लाटेचं
असून ज्ञात, उमगलंय का खरं,ते कुणाला 

खरंच, खरी असतात, अशी बेनामी नाती 
हुरहूर,ओढ, आयुष्यभर लावतात मनाला 

पटणार नाही हे सारं काही बहुदा जगाला 
पण एकदा विचारुन बघ प्रश्न हा स्वतःला 

https://marathikavita.co.in/index.php?topic=70760.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९