बुधवार, २४ मे, २०१७

तराणे


तराणे

तुझे ते सजणे लज्जेने पहाणे
खरे मानले मी सर्व ते बहाणे

नटावे कशाला मला ते कळेना
खर्‍या सौंदर्याचे दर्पनी पहाणे

चंद्राने सजावे हट्ट तारकांचा
रूपा देखण्या ते निशेचे बहाणे

शब्दांनी पुनःश्च जुळूनीच यावे
तयांना फुटावे सुरांचे तराणे

फिरूनीच यावे लुप्त गीत ओठी
सजावे मुखी त्वा पुन्हा प्रेम गाणे

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t28650/new/#new

मंगळवार, २३ मे, २०१७

कहाणी

कहाणी

का स्मरावी संध्येने
ती उदास विराण गाणी
जरी लिहिली कधी
कवीने विरहाची कहाणी
=शिव
392/23-05-2017

बुधवार, १७ मे, २०१७

किनारा


किनारा

उमडते है कभी कभी
यहां के सभी नदी किनारे
प्रेम कुजन चलें कहां
कहां बिदाई में मिलतें सारे

बहाता है सुख-दुःखों को
जाने कहां तक यह किनारा
मुकांध हो कर रात दिन
रहता है गवाह यह बेचारा

अलग, निशब्द रहना यहां
कैसे संभव इसे समझुं ना
तोड़ना चांहू यह सौहार्द
सोचकर भी मै  समझुं ना

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/hindi-kavita/t28593/new/#new

मंगळवार, १६ मे, २०१७

भास तूझा

भास तूझा

आभास पावलांचा, देतोय भास तूझा
स्मृतीत आठवांचा, हाेतोय भास तूझा

गंधाळला पहा हा, वारा तुझ्या सयीने
वेडावतो मला हा, स्वप्नाळु भास तूझा

सूरात गारव्याच्या, थेंबाळ पावसाळी
स्मृतीत आठवांच्या, स्वरात श्वास तूझा

रात्रीत गायलेला, साचा खमाज होता
प्रेमात सोबतीला, का सांग ध्यास तूझा

होताच चंद्रवर्खी, भावार्थ जीवनाचा
सारा विरून जातो, खोटाच राेश तूझा

साराच नूर ओला, ओढाळ पावसाचा
ओल्या सर्द दवाला, स्पर्श सुवास तूझा

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t28589/new/#new

शनिवार, १३ मे, २०१७

वाव

वाव

सार्‍याच आयुधांचे, मोठेच दुःख आहे
आप्तच आज सारे, लावीत धार आहे

स्वकीय मात्र येथे, सोडीत तीर आला
ईमान सोडलेल्या, हातात जोश आहे

स्वार्थात गुंतलेल्यां, वास्तव भान यावेे
तोडून पाश सारे, जाणे नक्कीच आहे

काही इथून न्यावे, कोणा कसे जमावे
खालीच हात येणेे, जाणे तसेच आहे

येथून सोबतीला, कोणीच येत नाही
स्मृतीत राहण्याते, सार्‍यांस वाव आहे

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/gambhir-kavita/t28545/msg68243/#msg68243

सोमवार, ८ मे, २०१७

खट्याळ


खट्याळ

पौर्णिमेचा खट्याळ चंद्र
चाहूल देतो सुख दूःखाची,
गुंतवुन कलेत स्वतःच्या
याद देतो बघ साजनाची !

=शिव
387/08-05-2017

रविवार, ७ मे, २०१७

स्मारके

स्मारके

मौनात गोठल्या त्या सार्‍याच आठवांची
बांधेन स्मारके मी माझ्याच आसवांची

डोळ्यांत सांधलेली खोडू कशी कहानी
शिल्पात स्मारकांच्या तूलाच पाहण्याची

प्रीतीच श्वास होता दोघात ना सखे तो
ठेऊन याद गेला त्या रेशमी सुखाची

भोळ्याच भावनांचा मांडून तो पसारा
खोटीच ठेवली मी आशा ग शोधण्याची

चाहूल लावते ती जीवास ओढ भारी
स्पर्शात भोगलेल्या स्वप्नील भावनांची

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/()-28487/new/#new

शनिवार, ६ मे, २०१७

ईमान

ईमान

दुनियेच्या या बाजारात
प्रत्येकाचा भाव वेगळा,
ईमान विकतां माणूस, लावी
ईमानदारीचा भाव वेगळा !

=शिव
386/05-05-2017

स्मरण


स्मरण

ओंजारल गोंजारलंं किती
शय्येवरी खुपदा कुरवाळलं
दुःखी कष्टी झालोच केंव्हा
घेवुन उरी स्वतःला सावरलं

ढाळलीत आसवे कितीदा
चेहर्‍यास तुझ्यात लपविलं
चिडलो जेव्हा कधी कधी
बेदिक्कत फेकूनही मारलं

लोकां नको ताणाया अती
कसं आपलं नातं जुळलं ?
स्मरा कि जरा बारकाईनं
स्मरण उशीचं आता झालं?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vinodi-kavita/t28479/new/#new

शुक्रवार, ५ मे, २०१७

यातना

यातना

खंत आहे रे आजची,
तो ओलावा हरवलाय नात्यातला,
जो तो गुंतलाय आज
तांत्रिक जगात
जग जवळ आलयं,
माणसं दूर गेली...
प्रेम, माया, आपुलकी
कुठेेतरी हरवत चालली
माणुस शिकला!
खरंच का रे
सुसंस्कृत झाला?
नक्की आपण कुठे आहोत?
न् कुठे चाललोत?
शोधतो तकलादू आश्रय,
पैसे फेकून आनंद घेतो,
वडील धार्‍यांना
वृध्दाश्रमात ठेवुन...
स्वतःचा त्रिकोण
किंवा चौकोन
गोंजारत बसतो...
शेवटी
एक एक कोन
निखळतोच...
तो पर्यंत
उशिर झालेला असतो...
आपण?
एकाकी पडण्याच्या भितीने
जीवंतपणीच
मृत्यु यातना भोगतो...

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/gambhir-kavita/t28474/new/#new