मंगळवार, ३१ डिसेंबर, २०२४

निरोपाची वाट ३११२२०२४ ya २३:४६:०९

निरोपाची वाट

निरोप २०२४ ला आपसूकच दिला जाईल 
दिल्याने निरोप खरं का तो विसरला जाईल

बरं वाईट किती अन् काय काय त्यानं दिलं
संदर्भ आणि इतिहासात, तो कायम राहील

असाच अखंड चालणारा, हा काळ प्रवास
नव्या कोऱ्या सुखांची पुन्हा निर्मिती करील

कर्तव्य,काम सुरू राहो आपल्या ठिकाणी
येणारा नवा फळ मात्र निश्चित योग्य देईल

अव्याहत चालते, रीत इथल्या वहिवाटीची
पावलागणिक खरं खोटं ती नक्की दाविल

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

बुधवार, २५ डिसेंबर, २०२४

अज्ञात वारकरी

अज्ञात वारकरी

शोधात कोण कोणाच्या इथवर मागोमाग चालले
वाट होती एकाकी, चालण्याचे तेव्हा भान कसले

भोळेभाबडे सारे, इथल्या अज्ञात पंढरीचे वारकरी
भास आभासात भेटले कित्येक, नाते असे कुठले

चाचपडता एक दूसऱ्यास कुणीच ना इथे कुणाचा
सोंग खरेखुरे तरीही बघ प्रत्येकाने हुबेहूब वठविले

ओढ अंतरीची जरी पदोपदी त्वा दावली कुणाला
आपल्यात दंगलाय जो तो, भान का त्यास उरले?

कुणा ठाऊक चालणार कुठवर ही वाटचाल अशी
देणे हे संचिताचे म्हणावे की फळ कर्माचे लाभले?
https://marathikavita.co.in/index.php?topic=49240.new#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मंगळवार, २४ डिसेंबर, २०२४

स्मरण

स्मरण

कित्येक घडले येथे काळ्यावर पांढरे करून
रडले तरी शिकले खुप काही मारुन मुटकून

एक एक धडा इथला आयुष्यात कामी येतो
उगाच का प्रत्येक जण अवघे जीवन जगतो

वाटले नकोसे, काही धडे इथले कधीकाळी
पटते आता, बरेचसे येतात कामी वेळोवेळी

तरीही खंत एक उरात दडली का कुणा ठावे
विखुरले सवंगडी सोबतीचे त्यां कुठे शोधावे

धरून हात, ज्यांनी जीवनाचे ते धडे गिरवले
वळणावर आयुष्याच्या गुरुजन सारेच स्मरले
https://marathikavita.co.in/index.php?topic=49209.new#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, २० डिसेंबर, २०२४

ख़ूबसूरत जीवन

ख़ूबसूरत जीवन

बहुत ख़ूबसूरत है जीवन अगर सोचों तो
हर पल मिलती है एक राह नयी देखो तो

आता है वक्त अच्छा बुरा सबके जीवन में
गुजरता हैं खुशहाल सफ़र अगर चाहों तो

रोज रोज मिलता है, सुरज कि किरणों से
अवसर नया एक हमें गौर से पहचानो तो

एक एक हलचल, सिखातीं है प्रकृति की 
जीवन की नयी सही हुनर कुछ सिखो तो

https://marathikavita.co.in/index.php?topic=49062.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

बुधवार, १८ डिसेंबर, २०२४

पोकळी

पोकळी

बंद दरवाजा, हि वाट एकाकी मोकळी
आसक्ती म्हणू की ओढ तुझी गं वेगळी

फोडावयास कोंडी आतूरल्या भावनांची 
सज्ज आहे निरागस, सांज एक सोवळी

भासतात का इथे स्पंदने मनाची मनाला
शांततेत इथल्या, तुझी न् माझी आगळी

शोधात तुझ्या, पायपीट इथवर जाहली
चाहूल ना कुठे तुझी मनी रिक्त पोकळी

सोहळे ऋतूंचे सर्व होतात त्यांच्या तऱ्हेने
का समजावी भेट आपली कुणी निराळी

https://marathikavita.co.in/index.php?topic=48974.new#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९ 

शुक्रवार, १३ डिसेंबर, २०२४

शेतकरी १३१२२०१४ yq १७:२५:४५

शेतकरी

स्वप्नात जगणाऱ्यांना
कष्टाची किंमत काय कळणार
पिझ्झा, बर्गर पिढीला
कष्टाळू शेतकरी कसा समजणार

रस्त्यावर यांची घासाघीस
मॉलमध्ये मुकाट एमआरपी देणार
शिकवायला मोल मातीचं
कोणतं बायोटेक कॉलेज पुढे येणार

वात्रटिका, 13-12-2024 YQ 05:25:45 PM

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सोमवार, ९ डिसेंबर, २०२४

सैरभैर वारा

सैरभैर वारा

वाहतोय सैरभैर मी वारा झालोय...
ओलांडून दऱ्याखोऱ्या मी भेटण्या आलोय

घेऊ म्हणतो विश्रांती क्षणभर येथे...
खबरबात प्रवासाची साऱ्या देण्या आलोय

किती ते गंध, रंग फुला माणसांचे...
ओळखू कसे खरे खोटे विचारण्या आलोय

कसे हे देणे प्राक्तनाचे मज भाळी...
चालेल कुठवर प्रवास हा जाणण्या आलोय

सगळेच कसे अनिर्बंध घडते येथे...
सैल का नियंत्रण?नियंत्या पाहण्या आलोय

https://marathikavita.co.in/index.php?topic=48488.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

बुधवार, २७ नोव्हेंबर, २०२४

आजकल २७११२०२४ yq १०:०१:१५

आजकल 

गलत को गलत कहो
फिर चाहें जो कुछभी होना हो

अच्छा, सच्चा जो होगा
उनकी तरफदारी मे सदा रहों!

बोलबाला झूठ,फरेब का 
आज वैसेभी मुफ्त में होता है

न्याय मिलने तक "सच्चा"
प्रतीक्षा मे अकेले ही रोता है!

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सोमवार, २५ नोव्हेंबर, २०२४

मुक्त कविता २५११२०२४ yq १२:५५:१७

मुक्त कविता

मुक्त छंद कविता
मन में दबी भावूकता
पता नहीं उसे, 
कब है उसे बहना...

निकलती है, 
अनगिनत सवाल लेकर
और थम जाती है
उस मोड पर उदासी के...
अछूते किनारे पर

देखती है, दर्पण में...
अपने आप को
खुद जो मग्न है
धूंधलाहट मे...

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, २२ नोव्हेंबर, २०२४

अपराध? २२११२०२४ yq १५:२२:१०

अपराध?
अपराध काय माझा
सावली तर देत होतो
पाखरांच्या आडोशाला
थोडासा आधार होतो

काय मागितले कुणास
मी माझ्या जगण्यासाठी
सारेच उपभोगले तुम्ही
जन्मले जे माझ्या पोटी

केला जरी कुणी डाव
मला नष्ट करण्याचा
वृत्ती परोपकार अशी
सुटेना ना हट्ट सेवेचा

पुन्हा पुन्हा जन्मेन मी
वसा निष्पाप धरित्रीचा
काही घ्या तिच्याकडून
घ्या वेध येत्या पिढीचा
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९ 

मंगळवार, १९ नोव्हेंबर, २०२४

खरे रूप १९११२०२४ yq ११:४२:२५

खरे रूप

निवडणूक सोहळा, होईल संपन्न
विसरू नका कोणी, करा रे मतदान,
राहून जागरूक, कर्तव्य करा रे
द्यावा निवडणूक, प्रतिनिधी सुजाण !

पुढील पाच वर्षे चालवे जो गाडा
अन्यथा ठरलेला, आहे नशिबी राडा,
पुढाऱ्यांचे काय? त्यांचा तर धंदा
जनतेस ना काही, त्यां तर भाव चढा !

वायदे, अश्वासने, ऐकलीत खूप
निकाला नंतर, घालेल का कुणी धूप?
म्हणून व्हा,आपण वेळीच सावध
मत द्या जाणून, उमेदवाराचे खरे रूप !

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०२४

गोष्ट अस्तित्वाची

गोष्ट अस्तित्वाची

सापडेना मज, स्वतःतला तु देवा हल्ली
देवळा देवळात शोधतो तुज देवा हल्ली

चेंगरून गर्दीत आणि लावीत रांगा मठी
असतो उभा फक्त,प्रदर्शनीत देवा हल्ली

कुठवर पहावी, वाट मी तुझ्या दर्शनाची
दिसशिल का रे, तु ओझरता देवा हल्ली

भक्ती किती, देखावा किती, काय सांगू?
जाणतोस तुच खरे मनातले देवा हल्ली

गोष्ट खरी सांगतो हळूच, ऐक तु एकदा
भक्तांमुळे इथे अस्तित्व तुझे देवा हल्ली

https://marathikavita.co.in/index.php?topic=47182.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०२४

कोणी तरी हवं १३११२०२४ yq १९:३७:०५

कोणी तरी हवं 

कोणी तरी हवं असतं...प्रत्येकाला
कधी गुजगोष्टी तर कधी भांडायला 

ठरवतो तुम्ही आम्ही खुप बोलायचं
तेव्हा सुद्धा असावं कुणी ऐकायला 

एकूण काय,माणूस आहोत आपण
म्हणून लागतंच कुणीतरी सोबतीला

साराच खेळ इथे हा भाव भावनांचा
अपेक्षा छोटी हवी समजून घ्यायला

एवढं सारं लिहितो सगळेच आपण  
नको का..मग कोणी तरी वाचायला

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मंगळवार, १२ नोव्हेंबर, २०२४

सब ठीक है

सब ठीक है

चिंता की कोई बात नहीं, सब ठीक है
ज़िन्दगी गुजर रही हैं बस् सब ठीक है

तरक्की की होड में, मगन है चंद लोग
बढती हैं मात्र बेरोजगारी, सब ठीक है

राजनीति चरम पर आजकल, देशभर
जिंदा हैं आम महंगाई मे, सब ठीक है

मश्गूल हरकोई अपने ही कुनबे में यहां
बट रहा है सिर्फ देश, और सब ठीक है

कौन देगा शिक्षा? कौन पढेगा किससे?
ग्यान दाता सोशल मीडिया,सब ठीक है

https://marathikavita.co.in/index.php?topic=47021.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

रविवार, १० नोव्हेंबर, २०२४

एम्.पी.एल्.



एम्.पी.एल्.

वा, महाराष्ट्र पोलिटिकल लीगची
मतदारां करता, बोली सुरु झाली आहे,

पंधराशे, एकविसशे, तीन हजार,
इत्यादी खैरातींचं अमिष दाखवलं आहे!

हा तर, पुढील पाच वर्षांंचा करार
कोण कुणाला स्वतः कडे ओढणार आहेत?

विचार करून, निर्णय घ्या मंडळी
सर्व संघ मालक टोपी लावण्यात ग्रेट आहेत!

https://marathikavita.co.in/index.php?topic=46928.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शनिवार, ९ नोव्हेंबर, २०२४

पुरे आता खैरात



पुरे आता खैरात

खरे खोटे दावे प्रत्येकजण
आताशा पोटतिडकीने मांडतो,
त्यांना किती लक्षात आलं?
मतदार खरोखर काय मागतो?

सोपं झालंय घोडं दामटणं
सर्वां वाटतं खरं त्यांचच म्हणणं,
तरी विसरू नका पुढाऱ्यांनो
ऐनवेळी मतदारच करतील सुन्न!

पैसा आहे तो जनतेचा सारा
तिजोरीत राज्याच्या डोकवा जरा!
पुरे आता योजनांची खैरात
अन्यथा म्हणतील नेता घरीच बरा!

https://marathikavita.co.in/index.php?topic=46865.new#new


©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शनिवार, ५ ऑक्टोबर, २०२४

नारी शक्ती

नारी शक्ती

नारी शक्तीला समर्पित...म्हणतो 
तरी पदोपदी पुरुषी अहंकार डोकावतो 
वेळ पाहून सत्कार कधीतरी,अन्
एरवी वासनेपोटी छेडाछेडी सुद्धा करतो 

वावरते ती,कैक रुपात सभोवती
माता, भगिनी कधी लेक आपली म्हणतो 
विसरून का मग, सर्व नातीगोती
समजून गरीब अबला शोषण करु पाहतो 

राहिली ना तु आता गरीब अबला
होती कधी तु रणरागिणी इतिहास सांगतो
साक्षर तु नव युगाची खरी धाडसी
घातली गवसणी गगनाला, संसार जाणतो 

https://marathikavita.co.in/index.php?topic=45637.new#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९


गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०२४

आदिशक्ति

आदिशक्ति

आदिशक्ति माता तुम्ही को, मिलने आया हूँ मै
दर्शन करने द्वार तुम्हारे लो फिरसे आया हूँ मै

नवदुर्गा, गायत्री, अंबे तु है इंद्राणी 
पर्शुधारिणी, शीतला, तू उमा नारायणी 
हे जगदम्बे, लक्ष्मी हो तुम, तुम ही हो माँ भवानी 
तेरे भक्ति से हो मंगल ऐसी शक्ती तुम्हारी...
कृपा रहे हम सबपर, बिनती करने आया हूँ में

आदि शक्ति माता तुम्ही को, मिलने आया हूँ में
दर्शन करने द्वार तुम्हारे लो फिरसे आया हूँ मै

दैत्यसंहारिणी, महामाया, पावे तु सबको 
दास बनकर, सेवा होकर करू प्रसन्न आपको, 
नवरात्री में निखरते हैं दिव्य रूप तुम्हारे, 
पाप सारे मिट जाते हैं, शरण आके तुम्हारे 
कृपा रहे हम सबपर, बिनती करने आया हँ में, 

आदिशक्ति माता तुम्ही को, मिलने आया हूँ मै
दर्शन करने दवार तुम्हारे, लो फिर आया हूँ में...

https://marathikavita.co.in/index.php?action=post;board=61.0

https://youtu.be/vvUaJ5EmfTE?si=HdZtrBbdULnpktdz

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

बुधवार, २ ऑक्टोबर, २०२४

सत्ता वास्तव

सत्ता वास्तव

भविष्याची स्वप्ने आताशा
प्रत्येकाला पडू लागली आहेत,

एकहाती सत्ता मिळवायची
दुंदुभिं सह गर्जना होत आहेत !

सत्ते पुढे नाही कुणी कुणाचा
जो तो इथे सत्य हे जाणून आहे,

आज जरी सुपात मी असलो
कधीतरी जात्यात जाणार आहे!

https://marathikavita.co.in/index.php?topic=45568.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

बुधवार, २५ सप्टेंबर, २०२४

प्रित रीत २५०९२०२४ yq ०८:२९:०७

प्रित रीत

प्रित की रीति, कभी न सिखाओं किसीको 
जानता है हरकोई खुद भलिभांति उसीको 

रोग कहें कोई इसे, कोई कहें लत प्यार की
भाव सच्चा वो खुद जानें दुसरा पता रबको 

होतेही अहसास, दो दिलों को धडकनों का 
अच्छा बुरा इसका, कौन समझाएं किसको 

खेल ये कुदरत का, मानो रचा रचाया सारा 
क्यों करें दखलंदाजी क्या हक है किसीको 

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सोमवार, १६ सप्टेंबर, २०२४

भविष्य १६०९२९२४ yq १७:३४:०५

भविष्य

भविष्य का एक पन्ना
चंद लोग लिखतें है
भविष्य का अनुमान
बहोत लोग लगाते है

बहुत बातें फिर भी
अनजानी रहती है
मेहनतकश लोग तो
रोज जीवन जीते हैं

16-09-2024 YQ 05:34:05 PM

रविवार, १५ सप्टेंबर, २०२४

यात्रा १२०९२०२४ yq १२:३२:०२


यात्रा

काश, रास्ता पता होता
तुम तक पहुंचने का
युहीं नहीं, लेकर बैठते
अंबार ये झुर्रियों का 

वक्त सारा बितता रहा 
दूरियां अचल ठहरी
अधूरीसी यात्रा तुम्हारी 
मेरी झुर्रियों से भरी

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९


बुधवार, ११ सप्टेंबर, २०२४

झाले पुरेसे

झाले पुरेसे

इथेच मरायचे प्रत्येकाला त्याच वाटेने जायचे
कळतंय सर्व जगताना तरीही हेवेदावे कशाचे

कोण मी नी कोण तु, घडीभराचे की रे सोबती
नेणार का सोबत काही, का उगा वेड संचयाचे

फायद्या विन जीवन सरते करण्यात माझे तुझे
होते रस्सीखेच हयातभर पाळून भूत संशयाचे

झाले का भले आजवर धरून वैरभाव कुणाचे
कसा विसरतो माणूस दाखले सारे इतिहासाचे

जगलो इथवर एवढेच होते रे क्षण होते बाकी
भोगले काय कसे, सारेच कसे काय सांगायचे

झाले पुरेसे प्राक्तनाने जे दिले आनंदी होताना
खुणावता वाट सुगंधी, शिव' न् काय मागायचे

https://marathikavita.co.in/index.php?topic=45293.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

अपघाती मरुन जाता

अपघाती मरुन जाता

पोर्शे, मर्सिडीज, टोयोटा न् आता ऑडी
पण काहीही म्हणा जोरात ठोकते गाडी
गाड्या तर म्हणं इंपोर्टेड हायेत साऱ्या
चुकतोय का हाकायला, डायव्हर गाडी?

कोण खरं, कोण खोटं? ठरवणार कोण
मोठ्यांचं तर काय,ते मँनेज पण करतील
जीवानिशी गेले, ते खरे व्यापातून सुटले
अपंग जे झाले त्यां मागे कोण धावतील

तारखा पडतील खुप सत्याचा शोध घेता
कळत नाही, चूक नक्की कोणाची आता
दबला कसा सामान्य टायर खाली यांच्या
कोण सांगणार खरं अपघाती मरुन जाता

https://marathikavita.co.in/index.php?topic=45292.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९







शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०२४

सामान्यांचे काय पडले?

सामान्यांचे काय पडले?

जाहिराती, घोषणांमधे मग्न सारे
त्यांना सामान्यांचे काय पडले?
तळी उचलणे, नावे ठेवणे इतुकेच 
त्यांच्याकडे काम की उरले !

सत्ता, अन् सरकारी साधन संपत्ती
तयांच्या हातचे खरे बाहुले,
राजरोस उपभोग घेण्यात मग्न सारे
त्यांना सामान्यांचे काय पडले?

वात्रटिका, 
September 06, 2024 YQ 02:58 :05 PM 

बुधवार, ४ सप्टेंबर, २०२४

देश माझा

देश माझा

विखुरला गेलाय? की
विकला गेलाय देश माझा?

नक्की काही कळत नाही
कधी नेते, पुढाऱ्यांच्या हाती,
कधी व्यापाऱ्यांच्या हाती,
न् जाती धर्माच्या वेठीला
कधीचाच बांधला गेलाय देश माझा...!

वरपासून खालपर्यंतचा भ्रष्टाचार
राज्या राज्यातले घडणारे अत्याचार, 
घोटाळे आणि गैरव्यवहार
तरीही चालतोय...कोणत्या
भाबड्या आशेवर देश माझा...?

जागतिक स्तरावर लोकसंख्येत 
मोठा असूनही महासत्ता
होणार म्हणतो आम्ही...
म्हणून का जाहिर करतोय
नवनव्या योजनांची खैरात आम्ही?

फुकट सुविधा, अन्नधान्य, अनुदान
घर बसल्या जर मिळतात पोटाला!
धीट होतो प्रत्येकजण, आपल्या कक्षेत
मग हवयं कशाला कष्ट, काम कुणाला?

पाचशेची नोट, क्वाटर, भांडी न् साड्या
पाच वर्षांकरता टिकतात आम्हाला...
मोकळे पुन्हा मतदानाच्या रांगेत जायला  
अशीच लोकशाही का काय ती? हवी
आंधळ्या प्रजेला, उजेड हवा कशाला?

https://marathikavita.co.in/index.php?topic=45291.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सोमवार, २ सप्टेंबर, २०२४

इथे अंधाराचे खेळे

इथे अंधाराचे खेळे

इथे अंधाराचे खेळे, सारे स्तब्ध होती व्यवहार
गल्ली बोळातून होई, यंत्रणेचा उध्दार उध्दार 

कामे जाती हो थांबून, राहते जनता अडून
होता सुन्न भोवताल, मनी शिव्याचेच थैमान
नको नको त्या शंकानी, उठते काहूर काहूर

वारा पाऊस थोडा येता, विज लगेच कापती
देत तीच जुनी कारणे, फोन देखील तोडती
संतापाने फुटे अंगी, घामाची नवी धार धार

घालवून नेहमी विज, येते वाढीव नवे बिल
करा निट हिशोब त्याचा, यां कोण हो सांगेल
हा कायम इकडे होतो, अजब प्रकार प्रकार

https://marathikavita.co.in/index.php?topic=45289.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

गुरुवार, २९ ऑगस्ट, २०२४

हरवलेले क्षण

हरवलेले क्षण

हरवलेले क्षण फिरून अनुभवावे म्हणतो
गूज सुखदुःखांचे पुन्हा आळवावे म्हणतो

आखीवरेखीव चौकोनात या जीव गुंतला
वाटते सानिध्यात सृष्टीच्या जगावे म्हणतो

कसली भुरळ पडते मनाला या क्षणोक्षणी
दगदगीस जीवनातल्या रे थोपवावे म्हणतो

सुखे आधुनिक अताशा, रोज रे भोगतांना
झोपडीत चंद्रमौळी, पुन्हा नीजावे म्हणतो

केवढी रे लालसा, तुला मानवा ऐहिकाची
त्यागण्याचे भान प्रसंगी सर्वां द्यावे म्हणतो

https://marathikavita.co.in/index.php?topic=45287.new#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मंगळवार, २७ ऑगस्ट, २०२४

बामसूरी

बामसूरी

साद घाली तुझी ही बासुरी...कान्हा 
नाही प्रित तुजसारखी दुसरी कान्हा 

भूल पाडूनी करी चराचरा आपलेसे 
मोद शमवी दुर्जनांचे आसुरी कान्हा 

बावरल्या, कैक गोपिका, गुरे वासरे
अमृत सुरांनी, बोलते बासुरी कान्हा 

असो पावा, मुरली, वेणु अनेक नावे
मंत्रमुग्ध सुरात बोले बामसूरी कान्हा 

युगे लोटली, कैक शासक आले गेले
रूप सुरात न बदलली बासुरी कान्हा
https://marathikavita.co.in/index.php?topic=45286.new#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

रविवार, २५ ऑगस्ट, २०२४

सारस्वत २५०८२०२४ १२:५६:०५

सारस्वत 

कवी प्रतिभेचा धनी 
लीन तो सरस्वती चरणी 

गोडी त्यास शब्दांची
भावनांची करतो मांडणी 

त्यां स्नेह वाङ्‌मयाचा
उभारतो कल्पनांची लेणी 

मोजक्या शब्दात मग
अविरत झरते एक लेखनी 

सारस्वतच जन्मता तो
म्हणे त्यां प्रतिभावंत कुणी

प्रेरणादायी कविता, 25-08-2024 YQ 12:56:05 PM
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शनिवार, २४ ऑगस्ट, २०२४

प्रसंगी २४०८२०२४ ०७:५१:०५
























प्रसंगी

ऐकावे जनाचे करावे मनाचे
साधावे हित कायम स्वतःचे

जगरहाटी बदलली अताशा
उरले ना, येथे कुणी कुणाचे

नाते मैत्री सारी औटघटकेची
देणेघेणे, उरतेच कुठे कशाचे

सल्ले मिळतात, खुप भोवती
ऐकावे किती स्वतः ठरवायचे

जुणे जाणते खरेच सांगून गेले
योग्य ते प्रसंगी ध्यानी घ्यायचे

ईतर कविता, 24-08-2024 YQ 07:51:05 AM

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०२४

समाजात २३०८२०२४ ०७:०६:१०

























समाजात 

एका हाताने टाळी वाजत नाही
तव्या शिवाय पोळी भाजत नाही

चांगले वाईट कर्म काहीही करा
त्याच्या शिवाय नाव गाजत नाही

असल्याशिवाय एखाद वरदहस्त
समाजात कोणी गुंड माजत नाही

उन्मत्त,बेलगाम, सत्तांध दुराचारी
सामाजात कुणालाच मोजत नाही

निष्पक्षपणे वापरला कायदा तर
पहा कुणाचीच डाळ शिजत नाही

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०२४

मोरया रे

मोरया रे

हे विघ्नहर्ता, हे विघ्नकर्ता, बाप्पा मोरया रे
हे लंबोदरा, हे करुणागारा बाप्पा मोरया रे

अबके आये हो तुम खुशियां लेकर 
नाचने गाने का मिलाता है अवसर
भक्ति भजन मे होगें लीन तुम्हारे
हर कोई गायेगा अब गीत तुम्हारे

हे विघ्नहर्ता, हे विघ्नकर्ता, बाप्पा मोरया रे
हे लंबोदरा, हे करुणागारा बाप्पा मोरया रे ...१

मोदक लड्डू कि मांग बढेगी
ग्यारा दिनों मे बडी धूम मचेगी
बाप्पा अकेले हो तुम ही दुलारे
त्यौहार तुम्हारा हम मनाएंगे सारे

हे विघ्नहर्ता, हे विघ्नकर्ता, बाप्पा मोरया रे
हे लंबोदरा, हे करुणागारा बाप्पा मोरया रे ...२

भक्तों के त्राता, बुध्दि देता तुम
दुखों के हरता, सुख दाता तुम
खुशियों से, यह जीवन भरना रे
कृपा हमपर, इतनी सी करना रे

हे विघ्नहर्ता, हे विघ्नकर्ता, बाप्पा मोरया रे
हे लंबोदरा, हे करुणागारा बाप्पा मोरया रे ...३

https://marathikavita.co.in/index.php?topic=45280.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

बुधवार, १४ ऑगस्ट, २०२४

सवाल १४०८२०२४ १६:००:१०


















सवाल

मेरे भारतीय डॉक्टर्स
शिकार कहीं शिकारी हो रहें हैं!

भगवान का दुसरा रुप
कैसे हैवानियत पर उतर रहें हैं!

कलकत्ता चाहें कटक
नियत,नियती किसकी खराब हैं?

घटनाएं दोनो शर्मनाक
क्यों हुआ इसका क्या जबाब हैं?

14-08-2024 TQ 04:00:10 PM
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सोमवार, १२ ऑगस्ट, २०२४

निष्फळ



























निष्फळ

भेटशील पुन्हा नव्याने...वाटलं होतं 
काय बोलू काहूर मनात दाटलं होतं 

होणार का सार्थक भेटीचं आपल्या 
उगाचच शंकेने मनाला ग्रासलं होतं 

पाहता तुज हाती, एक लाल गुलाब 
आपसूक मनाला हायसं वाटलं होतं 

गैरसमज सर्व झाले की करून दिले 
निष्फळ भेटीत कळून...चुकलं होतं 

असू दे, झालं ते योग्य झालं, समजू 
कदाचित नशिबात हेच लिहिलं होतं

https://marathikavita.co.in/index.php?topic=45278.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शनिवार, १० ऑगस्ट, २०२४

दाखले १००८२०२४ yq ०७:००:०७



























दाखले

समाजासाठी मी काय करावे...? 
संभ्रम असले मनी का पडावे...?

जाणून कर्तव्ये ती सर्व आपुली
निस्वार्थपणे पार पाडीत रहावे

भान ठेवूनी कुटुंब न् समाजाचे  
उत्थानासाठी त्या, कार्य करावे

देव,देश, धर्म अन् निसर्गासाठी 
यथाशक्ती,शक्य ते सारे करावे

दाखले श्रेष्ठ इतिहासाचे आपले
नैराश्यात पुन्हा पुन्हा ते स्मरावे

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मंगळवार, ६ ऑगस्ट, २०२४

संवेदनशील ०६०८२०२४ yq ०७:२४:१०

























संवेदनशील

बदलली परिस्थिती अचानक ती
काय घडले आहे शेजारी ते पहा

सोडून वाद, मत मतांतरे आपली
संवेदनशील वेळी एकोप्याने रहा

गृहकलही निखारे अस्तनीतले न्
टपून आहे दुजा, जो स्वार्थी आहे

बिकट प्रसंगी टिकवा तो एकोपा 
ज्या इतिहास आपला साक्षी आहे

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सवय ०५०८२०२४ yq ११:५०:००





















सवय

आईजीच्या जीवावर बाईजी उदार
सर्वत्र सुरु आहे असलाच कारभार

दाखवायचे न् खायचे वेगळेच दात
सहज जो गवसेल त्याला चावणार

सवय जडता एकदा फुकट खायची
मिळेल ते मजेत ओरबाडून खाणार

जात नाही कधी सहज सवय अशी
कसा काय करतील कुणाचा उध्दार

विरोध, नकार जर दाखलात तुम्ही
नक्की उठवतील हे, तुमचा बाजार

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

एक सर ०३०८२०२४ yq ०३:४४:३०

























एक सर

एक सर पावसाची येऊन ती काय जाते
पागोळ्या पुन्हा रोमांचित होऊन जातात
छतावर पडणाऱ्या एकएका थेंबाथेबातून
जून्या आठवणींना उजाळा देऊन जातात

पाऊस हा असा कित्येकदा पडत असतो
म्हणून का प्रत्येक वेळी हवासा असतो?
मनासकट सर्व आठवणींना स्वतः सोबत
नकोसा वाटत असता सोबत वाहून नेतो

डोळ्यासमोर कधी प्रलय येतो भावनांचा
अन नकळत त्याचाही जोर कोसळण्याचा
मग सुरू होते स्पर्धा, थेंब आधी की अश्रू?
विरहातला अनुभव कामी येतो वाहण्याचा

एकवेळ येते, पाऊस थकतो न् डोळे सुद्धा
संथ होऊन सर, अचानकच वारा सुरु होतो
मन स्तब्ध शांत, न् छप्पर ओघळत असतं
आश्वासक हात हलकेच खांद्यावर थबकतो

उबदार हाताच्या स्पर्शाने भानावर येतांना
नजर झुकते, थेंबामधे स्वतःला शोधू लागते
शोध संपत नाही आणि मन आवरत नाही
झटकन कवेत शिरता सर पुन्हा झरु लागते 

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मंगळवार, ३० जुलै, २०२४

अंतर

























अंतर

आयुष्याला द्यावे उत्तर 
जरी चालले ते समांतर
असून धेय्य एक दोहोंचे 
राखती मधे योग्य अंतर 

राग लोभ तो दोघातला
कमीजास्त होतो निरंतर 
अतूट धागा दोघांमधला
थांबणे ना कुठे क्षणभर

नित्याचीच बाब इथली
सावली कधी ऊन प्रखर
प्रवास हा आखीवरेखीव
म्हणूनी का द्यायचे अंतर

https://marathikavita.co.in/index.php?topic=45272.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सोमवार, २९ जुलै, २०२४

मावळती


























मावळती

शांत एकाकी मावळतीची दिशा
आपल्यातच हरवून गुंग झालेली
म्हणून थोडी हळवी, कातर सुद्धा
एकट्या जीवाला मनी भावलेली

तरल, कुठे गडद घेऊन रंग छटा
एकाकी वाऱ्यावर मंद रेंगाळलेली
होता शांत आत आत दिनकर तो
दावी नभी वेगळी नक्षी मांडलेली

हळवे जरी, अतूट नाते सांजेशी
जाणते रोज गोष्ट मनी साठलेली
उदास न् उल्हसित ती होत जाते
ऐकून अबोल साद मनामनातली

https://marathikavita.co.in/index.php?topic=45271.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

रविवार, २८ जुलै, २०२४

अंध सत्य २७०७२०२४ yq ११:२६:३०




























अंध सत्य 

असते का निरोपाची रेषा...? 
कित्येक वाटून घेतलेल्या
नात्यातल्या अंतरांवर?

दृष्टीस पडतात अदृश्य सीमा 
पावलोपावली चालतांना... 
सर्वत्र

निकष आर्थिक नसले तरी
जखडून घेतले आहे,
सर्वांनी धर्म, जात,पंथाच्या
सीमां मधे आणि...

त्यांच्याच रेषांच्या परिघात 
जे आहे, अंध सत्य..! 

ईतर कविता, 27-07-2024 YQ 11:26:30 AM

रविवार, २१ जुलै, २०२४

शेगावचे संत गजानन

























शेगावचे संत गजानन

शेगावीच्या थोर संताचे दर्शन मज झाले
दुख भय मज मनीचे दूर की हो गेले

आजाणूबाहू, उंच सडसडीत काया
प्रकटली मूर्ती घेऊन भक्तीचा पाया
दिगंबरावस्थेत सामान्यांच्या दृष्टीस पडले..१ 

वस्त्र लालसा न् पादत्राणे टाळूनी
शुद्ध ब्रह्म नित्य चालले अनवाणी
जीवनमुक्तांस देहाचे तेव्हा भान ना राहिले..२

कर्म, भक्ती आणखी योगमार्गाने
प्राप्त होई आत्मज्ञान ते सर्वार्थाने
वेळोवेळी ज्ञान देऊनी लोकांना शिकविले..३

गण गण गणात बोते मंत्र सांगूनी
नेक वाट भक्तां सन्मार्गाची दावूनी
ऋषिपंचमी पुण्यदिवशी चैतन्य हे लोपले..४

https://marathikavita.co.in/index.php?topic=45269.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मंगळवार, १६ जुलै, २०२४

जीवन वारी




























जीवन वारी 🚩

माझा विठ्ठल माझी वारी...चाले या संसारी 
कर्मकांड विठ्ठल माझे..श्वासांची उसनवारी 

चालतो अखंड पायी वेडा चाळा रे भक्तीचा 
माया भाबडी अनन्य भक्तीत रचलीस सारी

ओढ लागे भेटीची स्पर्श करण्या त्वा चरणी 
कळे तु वारीत चालता कसे फिरावे माघारी 

आठवे कृपाळू बरसता घन म्हणता सावळा 
अखंड महापूर ओसंडे श्रद्धेचा चंद्रभागे तीरी 

रित्या हाती येऊनी होऊन जातो शिवा तुझा 
कृपा प्रसाद पुरतो तुझा चालता जीवन वारी

https://marathikavita.co.in/index.php?topic=45268.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

रविवार, १४ जुलै, २०२४

संजीव




























संजीव

आयुष्यातल्या भावुक वळणावर...भेट तुझी 
नव उमेद जगण्याची देणारी ठरली भेट तुझी 

मनात कोरलेली ती गुंतागुंत का थोडी असते 
सैलावून बंध हळूवार ते घडून गेली भेट तुझी 

उरलो ना मी त्या क्षणी माझा..भारावून गेलो 
मंत्रमुग्ध करून मज मनात रुजली भेट तुझी 

घडून जाता सारे, उरलो नाही कुणाचे कोणी 
उमटवून ठसा आयुष्यावर या गेली भेट तुझी 

कौतुक न केवळ हे, जाणीव मन मनात उरते 
संजीव अगम्य असे...रुजवून गेली भेट तुझी 

https://marathikavita.co.in/index.php?topic=45267.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, ५ जुलै, २०२४

मानसिकता




























मानसिकता

किती वेळ मौनात राहू काळ काही थांबेना
वेदना अंतरीच्या माझ्या कुणालाही कळेना

तूच हो तुझी रणरागिनी, लढण्यास युद्ध हे
मनोवांछित करून घ्यावी पूर्ण तव कामना

गोठल्यात भावना सगळ्या शतकानुशतके
बंधनातून मुक्त करण्या कुणीही पुढे येईना

स्त्री शिक्षण न् स्त्री मुक्ती, झाले सर्व काही
यत्न केले बहुतांनी, तरीही स्थिती सुधरेना

अत्याचार, बलात्कार विरोधी कायदे, तरी
मानसिकता समाजाची तसूभरही बदलेना

https://marathikavita.co.in/index.php?topic=45266.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सेलिब्रिटीं हो ०५०७२०२४ yq १२:५२:०८

सेलिब्रिटीं हो



बुधवार, ३ जुलै, २०२४

स्वस्त मृत्यू ०३०७२०२४ yq ०३:१४:१०



























स्वस्त मृत्यू

"समृद्धी" वरचे मृत्यू नित्याचेच झाले
चैन, मजा करताना काही पाण्यात गेले,

काही भाग्यवान? तर सत्संगात गेले
स्वस्तात मरावे असे माणसा काय झाले!

नियम सारे तोडून, मरावे लोकांनी
का द्यावी नुकसान भरपाई सरकारने?

तिजोरीवर पडणाऱ्या अति भाराचा 
सवाल करावा कर भरणाऱ्या जनतेने!

वात्रटिका, July 0 3, 2024 YQ 03:14:10 PM

सोमवार, २४ जून, २०२४

जमेल तसं


























जमेल तसं

निसर्ग तुमचा आमचा सगळ्यांचा आहे आणि तो जेवढा आपल्याला सांभाळून घेतो त्याच्या काही प्रमाणात आपण सुद्धा त्याला सांभाळायला हवं नाहीतर त्याचे होत असणारे परिणाम आपण पाहतच आहोत दुर्दैवाने असं म्हणावं लागेल की आम्ही विकास, प्रगती वगैरे गोष्टीच्या नावाने ढोल बडवून वाट्टल तशी जंगलतोड करतो आणि त्या प्रमाणात दुसरी झाडे लावत नाही, थोडक्यात आपण त्याचं केलेलं नुकसान भरून काढत नाही किंवा त्याची नुकसानभरपाई करीत नाही, सभ्य भाषेत आपण असंही म्हणू शकतो की त्याचा समतोल राखायचा प्रयत्न करण्यात आपण कुठेतरी कमी पडतोय.

आजकाल बऱ्याच संस्थांकडून भरपूर ठिकाणी वृक्षारोपण, निसर्ग संवर्धन अशी कामं चालवली जात आहेत. मला वाटतं ही गोष्ट आपण आपल्या वैयक्तिक स्तरावरून व्यापक प्रमाणात आणि परिणामकारकपणे करू शकतो, ते म्हणजे आपण जी काही फळ खातो, त्यांच्या बिया जर व्यवस्थितपणे सांभाळून त्यांचं योग्य ठिकाणी रोपण करून वाढवलं तर ती रोप आपण आपल्या आजूबाजूच्या मोकळ्या परिसरामध्ये किंवा जंगल परिसरामध्ये वाढवू शकतो. तशात काही दिवसांपूर्वी एक अशी संकल्पना समोर आली की फळांच्या बिया अशाच फेकून देण्याऐवजी त्या बियां मातीत मिसळून त्याचे गोळे म्हणजे बीज चेंडू (Seed ball) तयार करून जंगलात टाकले तर हे काम चांगल्या पद्धतीने होऊ शकेल.

त्यातूनच प्रोत्साहित होऊ काही दिवसापूर्वी जमा केलेल्या आणि उपलब्ध बियांचे ५०-६० Seed ball तयार केले व रविवार, २३ जून रोजी मी राहतो त्या परिसरातील बारवी डॅम, बदलापूर जंगलामध्ये व्यवस्थित ठिकाणी सोडून आलो किंवा इतस्त: टाकून आलो असं म्हणता येईल. गम्मत म्हणजे यावेळी माझी दिड वर्षाची नात सायेशाने देखील भारी उत्साहाने मला मदत केली, त्याअगोदर अगदी मातीचे गोळे करण्यासाठी देखील तीने चांगलीच खोडकर मदत केली. तात्पर्य काय की लहान मुलांना आपण जसं शिकू तसं ती शिकतात आणि आपलं अनुकरण करतात, मग का नको आपण त्यांना चांगल्या सवयी लावायला? मी माझ्याकडून जमेल तसा प्रयत्न केला आपणही कराल? छोटीशी मदत निसर्ग जपायला?

~शिवाजी सांगळे, बदलापूर

बुधवार, १९ जून, २०२४

का वाटतं?



























का वाटतं?

सारचं जणू व्यर्थ आहे....का वाटतं? 
पाहून दु:ख, डोळा पाणी का दाटतं?

अत्याचार न् हत्या त्वेषात अबलेची
मानसिकताच बिघडली असं वाटतं!

ठेवावा कुठे भरवसा, जगताना इथे
राज्यकर्ते, आंधळे झालेत हे वाटतं?

विधिनिषेध वागण्याचा न दिसे कुठे
संस्कार पडतात कमी असंच वाटतं!

पिढी जुनी नवी भेदभाव नाही मुळी
तऱ्हाच वागण्याची बिघडली वाटतं!

https://marathikavita.co.in/index.php?topic=45264.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९